दर्गाह तुरबतीला मानकऱ्यांकडून गंध अर्पण : मंगळवारी ऊरूसाची सांगता
निपाणी (वार्ता) : संत बाबा महाराज चव्हाण यांनी स्थापन केलेल्या पिरानेपीर दस्तगीर साहेब यांचा उरुसाला रविवापासून सुरूवात झाला आहे. रविवारी संदल बेडीचा उरुस उत्साहाने पार पडला. यावेळी भाविकांनी दर्गाह तुरबतीला नेवैद्य दाखवून नवस फेडला. भाविकांनी आपल्या दंडातील चांदीची बेडी दंडवत घालून वाढवून देवाला गलेफ, नैवेद्य अर्पण केला. दर्गाह परिसरात तुरबतीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. सोमवारी (ता.७) ऊरूसाचा मुख्य दिवस आहे
उरुसाच्या गंधरात्रीनिमित्त चव्हाण घराण्याच्यावतीने गंध व गलेफ मानकऱ्यांसह सवाद्य नेण्यात आला. तो तुरबतीस अर्पण करण्यात आला. तत्पूर्वी चव्हाण वारसांच्या वतीने मलिदा, ताक, कन्या असा गोडा नैवेद्य अर्पण करण्यात आला. तर रविवारी रात्री जिजामाता चौकात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.
कोरोना महामारीमुळे सलग २ वर्षे प्रशासनाने कडक निर्बंध लादले होते. त्यामुळे ऊरूस साधेपणाने साजरा झाला होता. मात्र यावेळी कोरोना नसल्यामुळे ऊरूस उत्साहात साजरा करण्याचे नियोजन ऊरूस कमिटीने केले आहे. ऊरूस काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
चव्हाण वाडा येथे नवलिहाळ येथील मानकऱ्यांचे आगमन होवून चव्हाणवाडा मूळ गादी ठिकाणी गंध उगाळण्याचा कार्यक्रम पार पडला. तर, सायंकाळी मानकऱ्यांच्या उपस्थितीत दर्गाह ठिकाणी विधीवतपणे नैवैद्य नेण्याचा कार्यक्रम पार पडला. यावेळी यावेळी येथील संत बाबामहाराज चव्हाण वारस बाळासाहेब देसाई सरकार यांच्या निवासस्थानाहून मानाच्या भाकरीची रवानगी ढोल, ताशे, सनईच्या गजरात करण्यात आली. मंगळवारी (ता. ८) शिळा उरूस साजरा होणार आहे. या उत्सवाची भंडारखाना व पाकाळणी कार्यक्रमाने सांगता होणार आहे.
यावेळी उरूस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब देसाई-सरकार रणजीत देसाई-सरकार, संग्रामसिंह देसाई-सरकार,पृथ्वीराज चव्हाण,बंडोपंत गंथडे, दत्ता रावळ, दिलीप रावळ, प्रदिप रावळ, कृष्णात पिसे, सनी साळुंखे, आतिश सुतार, सदाशिव डवरी, यश दैव, वैभव सांगावकर, ईम्तियाज मुजावर, रेहान मुजावर, शकील मुजावर यांच्यासह ऊरुस कमिटीचे पदाधिकारी व सदस्य मानकरी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta