सौंदलगा (वार्ताहर) : येथील श्री उत्तमआण्णा प्रेमी व अरिहंत परिवार कडून दीपावली निमित्त घेण्यात आलेल्या भव्य किल्ला स्पर्धा व स्वतःच्या घरासमोर रांगोळी रेखाटने स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ युवानेते उत्तमआण्णा पाटील यांच्या उपस्थितीत झाला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थितांचे स्वागत धनाजी भेंडुगळे यांनी केले तर प्रास्ताविकात सागर यादव यांनी सांगितले की, दोन्ही स्पर्धेला नागरिकांचा, युवक, युवतींचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला. अकरा संघानी किल्ला स्पर्धेत व रांगोळी स्पर्धेत 38 स्पर्धकांनी भाग घेतला होता. यानंतर युवा नेते उत्तमआण्णा पाटील यांचा सत्कार शाल, श्रीफळ देऊन श्री. नरसिंह पी.के.पी.एस.चे संस्थापक चेअरमन सुदेश बागडी यांनी केला. तसेच परीक्षकांचाही सत्कार करण्यात आला.
या स्पर्धेत भाग घेतलेल्या संघांना व स्पर्धकांना निपाणी भागाचे युवा नेते उत्तमआण्णा पाटील यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. किल्ला विभागामध्ये प्रथम क्रमांक खांदेरी- उंदरी किल्ला, क्रांती गल्ली. द्वितीय क्रमांक रोहिडा किल्ला विठोबा गल्ली, नरसिंह- विठ्ठल युथ क्लब. तृतीय क्रमांक लोहगड किल्ला, गणेश देवस्थान साळुंखेनगर. चतुर्थ क्रमांक विभागून प्रतापगड किल्ला, दि ग्रेट तिरंगा युथ असोसिएशन, गावडेश्वरी गल्ली व पद्मदुर्ग किल्ला, नरसिंह गणेशोत्सव मंडळ, नरसिंह गल्ली यांना देण्यात आला. रांगोळी विभाग प्रथम क्रमांक श्री. विशाल शंकर गाडीवडर, द्वितीय क्रमांक कु. ऋतुजा रघुनाथ चौगुले, तृतीय क्रमांक कु. समीक्षा उत्तम आरेकर, चतुर्थ क्रमांक विभागून कु. स्नेहा कृष्णात पाटील व कु. वैष्णवी संजय पाटील, पाचवा क्रमांक सौ प्रियांका नंदकुमार पाटील- सुभान. या सर्वांना बक्षीसे व शिल्ड देण्यात आले.
या बक्षीस वितरणानंतर युवा नेते उत्तमआण्णा पाटील म्हणाले की, या किल्ला स्पर्धेमुळे युवकांना किल्ला करीत असताना बुद्धीलाही चालना मिळतेच त्याबरोबर शारीरिक व्यायाम ही घडतो. त्याचबरोबर आपल्या इतिहासाची माहिती मुलांना होते.यामध्ये सौंदलगा येथील युवकांनी मोठ्या प्रमाणात भाग घेतला हे कौतुकास्पद आहे. याबरोबरच दीपावली म्हणजे रांगोळी दारात रेखाटने हे सुरूच असते, त्यातूनच दीपावली निमित्त रांगोळी रेखाटन स्पर्धा घेण्यात आल्यामुळे महिला वर्गासह, युवतींनी मिळून 38 स्पर्धकांनी भाग घेतला हेही महत्त्वाचे आहे. यामुळे महिला वर्गात विविध प्रकारच्या रांगोळी काढणे, त्यात वैविध्यपूर्ण रंग भरणे ही आपली कला सादर केली. दीपावलीच्या कामातून सवड काढून आपल्या दारातच रांगोळी रेखाटणे असल्यामुळे विविध प्रकारच्या रांगोळ्या काढून या स्पर्धेमध्ये भाग घेतला याबद्दल मी सर्वांचे अभिनंदन करतो. त्याचबरोबर संस्कृती व महिलांच्या कलेला वाव देणे हा अरिहंत परिवाराचा हेतू आहे.
यावेळी रघुनाथ चौगुले, ग्रा. पं. सदस्या राजश्री शेवाळे, प्रभाकर आरेकर, प्रवीण सौंदलगे, पुंडलिक माळी, शिवाजी शेवाळे, भगवान पाटील, उदय पाटील, राजेंद्र कुरले, अमर सुतार, संतोष व्याघ्रांबरे, शामराव खराडे, प्रकाश आरेकर, अमृत चौगुले, रोहित शेवाळे, सुरेश पाटील, नामदेव पाटील, लखन हातकर, रामा पुजारी, शैलेश शेवाळे, प्रणव शेवाळे, अरिहंत परिवाराचे सर्व सदस्य, अरिहंत बँकेचे कर्मचारी यासह उत्तमआण्णा प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी आभार आप्पासाहेब कारंडे यांनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta