निपाणी (वार्ता) : येथील प्रगती नगरमधील साळुंखे गारमेंटचा सातवा वर्धापन दिन पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून कॅनरा बँकेचे व्यवस्थापक गंगाप्पा उपस्थित होते.
प्रारंभी विनोद साळुंखे यांनी स्वागत केले. यावेळी महिला कर्मचाऱ्यांना सातवा वेतन वाटप करण्यात आला. साळुंखे गारमेंट यंदाचा बेस्ट ऑपरेटरचा पुरस्कार साखरवाडीमधील गीता राऊत यांनी पटकावला. तर बेस्ट हेल्पर पुरस्कार शाहूनगर मधील पूजा शिंदे यांनी मिळवला. त्याना रोख रक्कम व मानचिन्ह देऊन देऊन कॅनरा बँकेचे व्यवस्थापक गंगाप्पा यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
सपना कांबळे यांनी गारमेंटच्या आधारामुळे वेतनामुळे कुटुंबाला आधार लागत असल्याचे सांगितले. वर्षा दळवी -कापशीकर यांनी गारमेंटमुळे आपल्याला जीवन जगण्याची दिशा मिळाल्याचे सांगितले. यावेळी अर्चना चंद्रकुडे यांनी सध्या ७० मशीनमुळे ८० महिलांना दररोज काम मिळत आहे. भविष्यात ७०० मशीन अनेक बेरोजगार महिलांना काम मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली. यावेळी वर्षा साळुंखे यांनी, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व समाज बांधवांना काम उपलब्ध करून देऊन स्वावलंबाने स्वावलंबी जिवण जगण्याचा मंत्र दिला. त्या मंत्रानुसार आपण अनेक महिलांना निरंतरपणे काम दिले आहे. या पुढील काळात आणखीन महिलांना काम देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. व्यवस्थापक महादेव पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. तर सुनिता रानमाळे यांनी कविता सादर केली.
यावेळी विजय साळुंखे, बाळासाहेब साळुंखे, सुंदर साळुंखे, वैजयंती साळुंखे, सुनिता खडके, जयश्री संकपाळ, मनीषा सावंत, ज्योती सुतार, आरती इटेकरी, संगीता राऊत, सुनिता गुणके, सजन कौर, गीता कांबळे, दिपाली एकले, सरिता पोवार, अंजना निकम, कोमल कुराडे, शितल बुबनाळे, माया नार्वेकर यांच्यासह गारमेंटचे पदाधिकारी, हेल्पर, ऑपरेटर उपस्थित होते. राजश्री लोहार यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta