निपाणी (वार्ता) : बुदिहाळ येथील विमा प्रतिनिधी सुभाष सदाशिव भादुले यांची सलग दहाव्या वेळी अमेरिका येथे होणाऱ्या नॅशनल टेनेस्सी या जागतीक दर्जाच्या सेमिनारसाठी एमडीआरटी क्लब सदस्य म्हणून निवड करण्यात आली. त्यामुळे ते सेमीनारसाठी जाण्यास पात्र ठरले आहेत.
सेमीनार पात्रतेसाठी सुभाष भादुले यांनी आपल्या विमा क्षेत्रामध्ये विमा ग्राहकांना चांगल्या दर्जाच्या सेवा पुरवल्यामुळेच त्याच्या ग्राहकांनी त्याना त्यांच्या व्यवसाय वृद्धीसाठी भरभरून सहकार्य केले. म्हणूनच ते सलग १० वेळा अमेरिकेला जाण्याचा मान पटकविला आहे. त्यामुळे बुदिहाळ गावच्या नावलौकीकात भर पडली आहे.
सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल नुकताच त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी चिकोडी शाखाअधिकारी भारमल, निपाणी सेटलाईट ऑफिसचे शाखा अधिकारी संजय कदम, विकास अधिकारी ए. एस. शेट्टी व कोल्हापूर शाखेचे विमा प्रतिनिधी राहुल माळी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. चिक्कोडी, निपाणी, बेळगांव परिसरामध्ये सदर पुरस्कार मिळविणारे भादुले हे एकमेव विमा प्रतिनिधी ठरले आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta