विठ्ठल नाईक यांची बैलगाडी द्वितीय : शर्यती शौकिनांची गर्दी
निपाणी (वार्ता) : येथील हजरत पिराने पीर दस्तगीर साहेब दर्ग्याच्या उरसानिमित्त सोमवारी येथील आंबेडकर नगर मध्ये आयोजित जनरल बैलगाडी शर्यतीत निपाणीच्या सचिन काटकर यांच्या गाडीने प्रथम क्रमांक पटकावून ५ हजार १ रुपयांचे बक्षीस व ढाल मिळवले. ननदी येथील विठ्ठल नाईक यांच्या बैलगाडीने द्वितीय क्रमांक मिळवून३ हजार १ रुपयांचे बक्षीस पटकाविले.
शर्यतीचे उद्घाटन ऊरुस कमिटी अध्यक्ष बाळासाहेब सरकार, पृथ्वीराज चव्हाण, रणजीत देसाई, संग्राम सिंह देसाई, प्रभाकर पाटील, विवेक राजू मोकाशी, राजू बुवा यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
घोडा-बैलगाडी शर्यतीत कार्याप्पा मरडे-ननदी, सचिन काटकर- निपाणी यांच्या गाड्यांनी अनुक्रमे प्रथम ते द्वितीय क्रमांकाची ३ हजार १ व २ हजार १ रुपयाची बक्षीस मिळवली.
घोडा गाडी शर्यतीत शांतिनाथ निगडे- इचलकरंजी, सदाशिव घाटगे-निपाणी व शिवाजी कांबळे निपाणी यांच्या गाड्यांनी प्रथम ते तृतीय क्रमांकाची ३००१ रुपये, २००१ रुपये आणि १००१रुपयांची बक्षीस मिळवली. त्यांना युवा नेते उत्तम पाटील, नगरसेवक संजय सांगावकर, ऊरूस कमिटी पदाधिकारी व मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.
यावेळी माजी नगरसेवक अनिस मुल्ला संभाजी मुगळे, विश्वास माळी, दादासाहेब कांबळे, अतिश शिंदे, सचिन माळी, जयसिंग कांबळे, श्रीकांत माळगे, शरद मळगे, धर्मा कांबळे, मधुकर पकाले, बसू जयकर, चेतन माने, प्रवीण मुगळे यांच्यासह आंबेडकर नगरातील नागरिक व शर्यती शौकीन उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta