
ऊरूसानिमित्त आयोजन :५५ चटकदार कुस्त्या
निपाणी (वार्ता) : येथील हजरत पिराने पीर ऊरसानिमित्त मंगळवारी सायंकाळी येथील संत बाबा महाराज कुस्ती मैदानात आयोजित जंगी कुस्ती मैदानामध्ये बानगे येथील कोल्हापूर मोतीबाग मधील पैलवान अरुण भोंगार्डे आणि शाहूपुरी तालमीचा पैलवान राघू ठोंबरे यांच्यात प्रथम क्रमांकाची कुस्ती लागली. त्यामध्ये अरुण बोंगार्डे याच्यात होऊन कोंदे एक चक्क डावावर राघू ठोंबरे यांनी दहा मिनिटात कुस्ती जिंकली. कुस्ती प्रेमी नागरिकांनी जल्लोष साजरा केला.
प्रारंभी खासदार अण्णासाहेब जोल्ले, ऊरुस कमिटी अध्यक्ष नगरसेवक बाळासाहेब सरकार, रत्न शास्त्री ए. एच. मोतीवाला, प्रा. रघु शिंत्रे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते कुस्ती आखाड्याचे उद्घाटन झाले.
अतुल डावरे-बानगे आणि महावीर झोडी त्यांच्यात द्वितीय क्रमांकाची कुस्ती लावली. उशिरापर्यंत ही कुस्ती चालल्याने ती बरोबरीत सोडविण्यात आली. त्यानंतर तृतीय क्रमांकाची कुस्ती शाहूपुरी येथील अमोल बागाव आणि कवठेपिरान येथील सुरजित करवते यांच्यात झाली. त्यामध्ये अमोल बागाव यांनी लपेट डावावर सुरजितला आस्मान दाखविले.
निलेश हिरूगडे आणि दयानंद शिरगावे यांच्यात चौथ्या क्रमांकाची कुस्ती लावली. त्यामध्ये निलेशने बाजी मारली. बानगे येथील ओंकार लंबे आणि शिरगाव येथील सज्जन क्षिरसागर यांच्यात पाचव्या क्रमांकाची कुस्ती होऊन ओंकारने घिस्सा डावावर विजय मिळवला. त्याशिवाय ५५ लहान मोठ्या चटकदार कुस्त्या झाल्या. विजेच्या मल्लांना रमेशबाबा सरकार, पृथ्वीराज चव्हाण, संग्रामसिंह देसाई सरकार, रणजीतसिंह देसाई सरकार, पैलवान सुभाष कांबळे, श्रीमंत दादाराजे देसाई सरकार व मान्यवरांच्या हस्ते बक्षीसे देण्यात आली. यावेळी हनुमंत घुले, कृष्णात घुले, राहुल माने यांनी बहारदार हालीवदन केले. पंच म्हणून सुरेश लंबे, बाळू मेटकर, के .बी. चौगुले, मारुती पोवार, शंकर कदम यांनी काम पाहिले तर राजाराम चौगुले यांनी कुस्ती स्पर्धेचे समालोचन केले.
यावेळी उरूस कमिटीचे संजय माने, प्रभाकर पाटील, शरदचंद्र माळगे, विवेक मोकाशी, शामराव कांबळे, युवराज पोळ, दत्ता नाईक, शौकत मनेर, दीपक सावंत, डॉ. जसराज गिरे, अस्लम मिरकारी, ईश्वर शिंदे, आतिश सुतार, सनी साळुंखे, मिलिंद मेहता, मेजर बाबू पाटील, सचिन पावले, निलेश पावले, पैलवान राजू शेख यांच्यासह निपाणी व ग्रामीण भागातील कुस्ती प्रेमी उपस्थित होते. यावेळी पोलिसांनी चौक बंदोबस्त ठेवला होता.
Belgaum Varta Belgaum Varta