Share
निपाणी : सर्व धर्मियांच्या ऐक्याचे प्रतिक हजरत दस्तगीर साहेब यांच्या ऊरूसाच्या तिसऱ्या दिवशी ८ रोजी पहाटे निपाणी येथे दर्गाहचे संस्थापक श्री संत बाबा महाराज चव्हाण यांच्या चव्हाण वारसातर्फे मानाचा निशाण व गलेफ संग्रामसिंह देसाई सरकार, रणजितसिंह देसाई सरकार, पृथ्वीराज चव्हाण, नवनिहालकर सरकार, दादाराजे देसाई – निपाणकर सरकार यांच्या हस्ते लवाजमा मानाचे फकीर व मानकरी यांच्या उपस्थितीत अर्पण करण्याचा विधी उत्साहात पार पडला. यावेळी विशेष प्रार्थनाकरीत निपाणी परिसरात सुरू असलेली ही संत परंपरा निरंतरपणे अशाच पध्दतीने सुरू रहावी. संतांच्या या भुमिचा सर्वांना लाभ व्हावा. भागात सुख, समृध्दी व एकोपा आणखीन वृध्दिंगत व्हावाअशी प्रार्थना करण्यात आली.
त्यानंतर मुळगादी चव्हाण वाडा येथे चव्हाण वारस पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते खारीक, उदी वाटपाचा कार्यक्रम झाला. याचा असंख्य भाविकांनी लाभ घेतला.
Post Views:
401
Belgaum Varta Belgaum Varta