Tuesday , December 9 2025
Breaking News

निपाणी सद्गुरु हॉस्पिटलतर्फे विठ्ठल पाटील यांचा सत्कार

Spread the love
निपाणी (वार्ता) : मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन मॅक (कागल फाईव्ह स्टार कागल-हातकणगले औद्योगिक वसाहत) या संस्थेच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड झाली. त्यात ऑननरी सेक्रेटरी पदावर सौंदलगा – कागल येथील उद्योजक विठ्ठल ईश्वर पाटील (कागल) यांची निवड करण्यात आली. त्याबद्दल निपाणी येथील सद्गुरु हॉस्पिटलतर्फे डॉ. उत्तम पाटील यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार केला.
निपाणी तालुका पीएलडी बँकेचे अध्यक्ष एस. एस. ढवणे यांनी, जिद्द, चिकाटी व जोरावर विठ्ठल परिश्रमाच्या जोरावर पाटील यांनी उद्योग क्षेत्रात भरारी घेतली आहे. सध्याच्या युवकांनी त्यांचा आदर्श घेऊन वाटचाल करण्याचे आवाहन केले.
डॉ. उत्तम पाटील यांनी, उद्योजक विठ्ठल पाटील यांनी अविरत कष्ट घेतल्याने हे यश मिळाले आहे. त्यांनी आपल्या प्रेरणेने आयुष्यात अनेकांना उभे केले. आपणास देखील त्यांनीच मार्गदर्शन केल्याने वैद्यकीय क्षेत्रात करिअर करत आल्याचे सांगितले. यावेळी सद्गुरु हॉस्पिटलच्या डॉ. प्रतिभा पाटील, हॉस्पिटलचे पीआरओ संभाजी पाटील, सौंदलगा पीकेपीएसचे संचालक डॉ. तानाजी पाटील, गलगले सामाजिक कार्यकर्ते विलास पाटील, निपाणीच्या सद्गुरु मेडिकलचे प्रबोधन उर्फ नवनाथ पाटील उपस्थित होते. या निवडीबद्दल त्यांचा विविध संस्था व मान्यवरांतर्फेही ठिकठिकाणी सत्कार करण्यात  आला.

About Belgaum Varta

Check Also

इचलकरंजी येथील युवकाचा निपाणी जवळ खून

Spread the love  धारदार शस्त्राचा वापर ; मृतदेह टाकला ओढ्यात निपाणी (वार्ता) : इचलकरंजी येथील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *