Share
शिक्षकांच्या विविध मागण्या : सहभागी होण्याचे आवाहन
निपाणी (वार्ता) : कर्नाटक राज्य माध्यमिक सहशिक्षक संघटनेच्या निपाणी तालुका विभागातर्फे बंगळूर येथे विविध मागण्यांसाठी बुधवारी (ता. २३) मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यामध्ये तालुक्यातील सर्व माध्यमिक शिक्षकांनी सहभागी होण्याचे आवाहन तालुका अध्यक्षअध्यक्ष टी. बी. बेळगली यांनी केले आहे. संघटनेच्या आयोजित बैठकीत त्यांनी ही माहिती दिली.
तालुक्यातील सरकारी, अनुदानीत माध्यमिक शाळांना भेट देवून शिक्षकांच्या समस्या जाणून घेतले आहेत. २००६ नंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांना येणाच्या येणाऱ्या अडचणी बाबत बेंगळूरमधील एनपीएस संघातर्फे मोर्चा काढण्यात येणार आहे. तरी या मोचामर्थ्ये बेळगांव जिल्ह्यातील सर्व शिक्षकांनी सहभागी होऊन मोर्चा यशस्वी करावा.
एस.एस. एल. सी. परिक्षा मौल्यमापन, १० वर्ष, २०वर्ष टाईम बाँड विषयी चर्चा करून शिक्षकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी आश्वासने दिली आहेत त्याबाबतही चर्चा होणार आहे.
बैठकीस संघाचे जिल्हा कार्यदर्शी आदमअली पिरजादे, संचालक बी. ए. हिरेगौडर, जे. डी. पाटील, आर. आर. जनवाडे, एम. ए. उस्ताद, एन. बी. कुंभार, एस. बी. पाटील, पी. ए. खोत उपस्थित होते.
Post Views:
462
Belgaum Varta Belgaum Varta