
अरिहंत चषक फुटबॉल स्पर्धा : लाखाचे पहिले बक्षीस
निपाणी (वार्ता) : येथील निपाणी फुटबॉल ॲकॅडमीच्या आयोजनाखाली उत्तमअण्णा युवा शक्ती व अरिहंत उद्योग समूहाच्या वतीने शनीवार (ता.१२) पासून समर्थ मंडळ व्यायाम शाळेच्या मैदानावर भव्य फुटबॉल स्पर्धेचे आयोजन केले आहे. त्याची युद्ध पातळीवर तयारी सुरु आहे.
प्रेक्षकांच्यासाठी गॅलरी, खेळाडुंच्या जेवण व राहण्याची व्यवस्था अरिहंत ग्रुपच्या वतीने करण्यात आली आहे. सहकाररत्न रावसाहेब पाटील (दादा) यांच्या आशीर्वादाने व युवा नेते उत्तम पाटील, युवा उद्योजक अभिनंदन उर्फ पाटील यांच्या सहकार्याने या स्पर्धा होत आहेत.
या स्पर्धेने स्पर्धेमध्ये युनायटेड बेळगांव ब्रदर्स, एफ सी साहनी, एफ आय सी बूफा यूनायटेड व स्पोर्टींग प्लॅनेटस (सर्व बेळगांव), दिलबहार तालीम, बालगोपाल तालीम व आर के स्पोर्टस (सर्व कोहापूर) युनायटेड, के वी आर, सीटी (सर्व गडहिंगलज) मंगळवार पेठ मिरज, जुबेर एफसी सांगली, एफसी मंगलोर एनाफेमा, पी एफ सी हिटवास मुंबई), डेनवर स्पोर्टस खोपोडी, अझटेक्स मुंबई, पवन एक सी (बी), शुजा स्पोर्ट -बीड, सिल्वाला यूनायटेड -दिव दमण, गतविजेता गोवा पोलिस यासह स्थानिक दोन संघ सहभाग घेतला आहे. केरळ युनायटेड व लोक केरळ यापैकी एक संघ प्रवास नियोजनामुळे प्रलंबीत आहे. या स्पर्धेचा प्रवेश तांत्रीक अडचणीमुळे थांबण्यास वाहक कार्ड प्रवेश गुजरात उत्तराखंड किंवा स्थानीक संघ यांना प्रवेश मिळेल. स्पर्धेसाठी मान्यता प्राप्त पंचांचे पॅनल नियुक्त करण्यात आले आहे.
उद्घाटनचा सामना शनिवारी (ता१२) दुपारी वाजता युवा नेते उत्तम पाटील व मान्यवरांच्या उपस्थितीत होईल. उद्घाटनसाठी भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. तत्पूर्वी उर्वरित सामने सकाळच्या सत्रात होतील. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी उत्तम पाटील युवा मंचचे पृथ्वीराज पाटील यांच्यासह कार्यकर्ते तयारी करत आहेत. तरी या स्पर्धांचा लाभ निपाणी व परिसरातील क्रीडाप्रेमी घ्यावा, असे आवाहन ॲकॅडमीचे अध्यक्ष धनंजय मानवी व सहकाऱ्यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta