
हंचिनाळ येथे खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या हस्ते पानंद रस्त्याचा शुभारंभ
हंचिनाळ : निपाणी विधानसभा मतदारसंघांमध्ये मुख्यमंत्र्यांच्या विशेष अनुदानातून. 50 55 योजनेअंतर्गत 46 कोटी रुपये निधी मंजूर झाला असून त्यातून मतदारसंघात दर्जेदार पानंद रस्ते होणार असल्याचे प्रतिपादन चिकोडीचे खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी केले.
हंचिनाळ ता. निपाणी मंत्री शशिकला जोल्ले यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या कदम क्रॉस बस स्थानकापासून महाराष्ट्र हाद्दीपर्यंतच्या दीड किलोमीटर रस्त्याच्या डांबरीकरणासाठी एक कोटी रुपये अनुदान मंजूर झाले असून त्याचा शुभारंभ खासदार जोल्ले यांच्या हस्ते संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आणि हंचिनाळ ग्रामपंचायतचे अध्यक्ष बबन हवावलदार हे होते.
प्रारंभी ज्योती हवालदार मनीषा गवळी, सविता पाटील, पद्मा पाटील, संगीता मंगसुळे, जयश्री हवालदार, आशाताई पोतदार. या महिलांच्या हस्ते मशीन पूजन करण्यात आले. त्यानंतर विविध मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून रस्त्याचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी बोलताना खासदार जोल्ले पुढे म्हणाले, हंचिनाळ कोगनोळी रस्त्याच्या कामासाठी एक कोटी रुपये मंजूर झाले असून उर्वरित अनुदान प्राप्त झाल्यानंतर हाही रस्ता मजबूतपणे करून देणार आहे. मतदारसंघातील कोणत्याच रस्त्याकडे दुर्लक्ष होणार नाही याची आम्ही हमी देत असल्याचे सांगितले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य एम. वाय. हवालदार, कोगनोळी वीरेश्वर शाखाध्यक्ष कुमार पाटील, निपाणी ग्रामीण भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा सरोजिनी जमदाडे आदींनी आपल्या मनोगत आतून खासदार जोल्ले, मंत्री शशिकला जोल्ले यांनी राबवलेल्या विकास कामाचा आढावा घेतला.
या कार्यक्रमाला बेनाडीचे रमेश पाटील, गणेश कोंडेकर, सुनील कांबळे, राजू सुतार, एन.डी.वंदुरे, अमोल ढाले, अनिल मंगसुळे, बाबासो अकोळे, शिवाजीराव गायकवाड, पांडुरंग कोंडेकर, सागर चौगुले, गुंडू पंचम, बसगोंडा बस्तवडे, केशव पाटील, दादासाहेब भिवसे, विनोद संकपाळ, काशिनाथ जनवाडे यांच्यासह परिसरातील आणि गावातील भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta