हजारो भविकांची गर्दी : अंबाबाई, बिरदेव पालखी मिरवणूक
कोगनोळी : येथील हजारो भविकांचे श्रध्दास्थान आसलेल्या श्री अंबिका देवीचा जागर व नवरात्रोत्सव सोहळा उत्साहात साधेपणाने संपन्न झाला. बुधवार (तारीख 13) जागर सोहळयानिमित्त दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.
सकाळी आठ वाजता देवीची आरती करून सजविलेल्या पालखी छत्रपती शिवाजी महाराज चौक, महादेव गल्ली, लोखंडे गल्ली, पी ऑन्ड पी सर्कल, मगदूम गल्ली, माळी गल्ली अशी भव्य सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. सर्वत्र दुतर्फा रांगोळी व पुष्पवृष्टी करण्यात आली.
अंबिका मंदिरासह गांवातील विविध मंदिरावर आकर्षक विद्यूत रोषणाई करण्यात आली होती. माजी उर्जा मंत्री वीरकुमार पाटील, तालूका पंचायत सदस्य प्रितम पाटील, माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील, माजी मंडल पंचायत अध्यक्ष शरद पाटील(काका), योगेश पाटील, अतुल कुलकर्णी, सी. के. पाटील, अनिल चौगुले, आप्पाासाहेब मगदूम, अशोक मगदूम आदीच्या उपस्थित आरती करण्यात आली.
या मिरवणूकीत बिरदेव पालखी व अश्वाचा समावेश होता. पालखी मिरवणूक गांवातील प्रमुख मार्गावरून मंदिराजवळ आल्यावर अश्वासह, पालखी मानकरी यांनी धावत जावून मंदिर प्रदक्षिणा घेतली. यावेळी वालंग झाला. रात्री 12 वाजता मान्यावरांच्या उपस्थित आरती झाल्यावर पालखी मंदिर प्रदक्षिणा झाली. देवीला नैवेद्य दाखवून सात दिवसाचे उपवास सोडण्यात आले.
मंदिरात अनिल गुरव, सचिन गुरव, साहिल गुरव, सुरेश गुरव, बाळासो गुरव, संजू गुरव, अशोक गुरव यांच्याकडून देवीची वेगवेगळ्या रूपात पुजा बांधण्यात आली होती.
देवीच्या जागर सोहळयास मुंबई, पुणे, कोल्हापूर, निपाणी, संकेश्वर, सांगली, सातारा, बेळगाव, चिक्कोडीसह पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी गर्दी केली होती.
Check Also
पुर्वीप्रमाणे पाणी बील आकारणीचा पहिला ठराव मंजूर करावा
Spread the love निपाणी (वार्ता) : येथील नगरपालिकेच्या नुतन पदाधिकाऱ्यांची पहिली सर्व साधारण सभा मंगळवारी …