युवानेते उत्तम पाटील : बोरगाव येथे 85 पूरग्रस्तांना 5 लाखांवर धनादेश वितरण
निपाणी : कोरोना, महापूर यासह नैसर्गिक संकटामध्ये समाजासाठी काहीतरी केले पाहिजे. आपल्यातील माणुसकीचा उपयोग हा समाज कार्यासाठी झाला पाहिजे, या हेतूने शहरातील पोलीस पाटील असलेल्या शशिकला पाटील यांनी निपाणी मतदार संघातील पूरग्रस्तांना प्रत्येकी 5 हजार रुपयाची मदत देऊन सामाजिक हित जोपासले आहे. त्यांची ही मदत सर्वांसाठीच लाखमोलाची आहे, असे मत युवा नेते उत्तम पाटील यांनी व्यक्त केले.
बोरगाव येथील अरिहंत सभागृह येथे युवा नेते उत्तम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली निपाणी मतदारसंघातील कोडणी, बुदिहाळ, यमगरणी, नांगानुर, जत्राट, अकोळ, ममदापूर, सिदनाळ, हुन्नरगी, कारदगा व बारवाड येथील 85 पूरग्रस्तांना 5 लाखांवर मदत निधीचे धनादेश वितरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
उत्तम पाटील म्हणाले, महापुरामुळे अनेकांवर मोठे संकट आले. अनेकांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले. अशा परिस्थितीमध्ये अरिहंत उद्योग समूहसह अनेक लोकांनी शासनाच्या अगोदर पूरग्रस्तांसाठी धावले. ही मदत पुरात अडकलेल्या पूरग्रस्तांसाठी मोठा आधार ठरली. काळाची गरज ओळखून आपण निपाणी तालुक्यातील पूरग्रस्तांसाठी मदत केली.या बरोबरच शहरातील शशिकला पाटील यांनी सुद्धा आपल्या कुटुंबियांसमवेत चर्चा करुण माणुसकीच्या दृष्टीने त्यांनी न मतदारसंघातील पुरग्रस्तांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचा आर्थिक मदत केली आहे. पाटील कुटुंबियांचा आदर्श घेण्यासारखे असल्याचे मत युवा नेते उत्तम पाटील यांनी व्यक्त केले.
कुटुंब प्रमुख अभियंते राजेंद्र पाटील म्हणाले, बेळगाव जिल्ह्यासह कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातही महापुराने थैमान घातले होते. या दरम्यान आपण सांगली जिल्ह्यातील ही मदत करण्याचे ठरवून त्या ठिकाणी असलेल्या पूरग्रस्तानाही आपल्या काकिंच्या सहाय्याने मदत केली आहे. निपाणी तालुक्यात यावर्षी महापुराचा फटका बसला. या अनुषंगाने आपण उत्तम पाटील यांच्याशी चर्चा करून पूरग्रस्तांना आर्थिक मदत केली आहे.
याप्रसंगी उत्तम पाटील यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते व पाटील कुटुंब यांच्या हस्ते पूरग्रस्तांना धनादेश वाटप करण्यात आला.
कार्यक्रमास डॉ. संजय पाटील, अभियंते राजेंद्र पाटील, जत्राट ग्रामपंचायत अध्यक्ष रोहन भिवसे, ममदापूर ग्रामपंचायत अध्यक्ष अमरसिंह पाटील, यमगरणीचे प्रभाकर पोकले, बुदिहाळचे अनिल संकपाळ, हुन्नरगीचे दादा पाटील, सिदनाळचे पोपट मगदूम, कारदगाचे विनोद ढेंगे, सुभाष ठकाने, दत्ता खोत, मल्लू भागाजे, सुषमा मांगुरे, विशाल पाटील, अक्कोळ पि.के.पी.एस. अध्यक्ष युवराज पाटील, पोपट सिदानाळे, ममदापूरचे प्रकाश पाटील, गजानन कावडकर, अमित शिंदे, नांगनुरचे प्रमोद खोत, भीमराव हजारे, कोडणीचे भूपाल खोत, बारवाडचे शशिकांत अर्जुनवाडे, विजय पाटील, तानाजी चौगुले, सुरेखा घाळे, मारूती निकम , बाळासाहेब सातपुते, अभय करोले, संगप्पा एदमाळे, शिवानंद राजमाने, सुमित रोड्ड, तैमूर मुजावर यांच्यासह निपाणी तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते. के. बी. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. अभयकुमार मगदूम यांनी आभार मानले.
Check Also
सीमाभागात रोजगार मेळावा घेण्याबाबत समितीच्या शिष्ठमंडळाने घेतली खा. धैर्यशील माने यांची भेट
Spread the love बेळगाव : महाराष्ट्र शासनातर्फे सीमाभागातील बेरोजगार तरूणांसाठी शिवजयंतीचे औचित्य साधून रोजगार …