Wednesday , December 10 2025
Breaking News

इचलकरंजी पाणी योजनेबाबत वेदगंगा काठाची भूमिका काय?

Spread the love
काळम्मावाडी मुळेच वेगवेगळ्या राहणार कायम पाणी : ‘दूधगंगे’च्या लढ्यात सीमावाशीयांनी झोकून द्यावे
निपाणी (वार्ता) : इचलकरंजीच्या पाणी योजनेबाबत सीमाभागातील महाराष्ट्रात दूधगंगा काठावर असलेल्या नागरिकास शेतकऱ्यांनी विरोध करून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर ही मोर्चा काढला. त्यामध्ये कर्नाटक सीमाभागातील रयत संघटनेसह विविध शेतकरी संघटना आणि शेतकरीही सहभागी झाले होते. वेदगंगेचे निरंतर पाणी हे दूधगंगेवरील काळम्मावाडी प्रकल्पावर अवलंबून आहे. चार टीएमसी पाणी मिळत असले तरी महाराष्ट्र सीमाभागातील शेतकऱ्यांच्या पाठीशी या भागातील शेतकरी राहणे आवश्यक असतांना वेदगंगा काठ अद्यापही थंडच आहे.
वेदगंगेला बारमाही पाणी मिळावे यासाठी सन १९९४ साली तत्कालीन मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा यांचा मंत्रिमंडळात असलेले पाटबंधारे मंत्री एच. के. पाटील, ऊर्जा मंत्री वीरकुमार पाटील, तत्कालीन आमदार काकासाहेब पाटील, महाराष्ट्राचे दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख, दिवंगत खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्यासह नेते मंडळींच्या सहकाऱ्यांनी काळमवाडी प्रकल्प करार झाला. त्यामुळे बारमाही पाणी मिळू लागले आहे.
सीमाभागातील महाराष्ट्रातील दूधगंगेचे पाणी इचलकरंजीला पुरविले जाणार त्यावरून आता विरोधाची ठिणगी पडली आहे. सीमा भागातील नऊ गावातील शेतकऱ्यांनी वेळोवेळी आंदोलन व निवेदन देण्याचा प्रयत्न केला आहे पण उर्वरित वेदगंगा काठावरील एकाही गावात एकही बैठक किंवा विरोधाची ठिणगी पडलेली नाही.
वेदगंगा आणि दूधगंगा पाणी याबाबतचा फार मोठा संबंध दोन्ही नद्यांचा आहे. या दोन स्वतंत्र नद्या असल्या व दूधगंगेवर काळम्मावाडी प्रकल्प असला, तरी याच प्रकल्पावर वेदगंगेचे बारमाही पाणी अवलंबून आहे.
काळम्मावाडी प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर दूधगंगेला पाणी सुरू झाले. तेव्हापासून जानेवारीपासून कोरडी पडणारी वेदगंगा नदी बारमाही दुथडी वाहत आहे. या नदीतून तसेच दूधगंगा व कॅनॉलद्वारे कर्नाटकलादेखील पाणी जाते. वेदगंगा बारमाही वाहत असतानादेखील २०१६ व २०१९ मध्ये वेदगंगेवर १९९४ नंतर प्रथमच उपसाबंदीदेखील लावण्याची वेळ आली होती. त्याचा वेदंगा काठावरील पाणी योजना सह शेतकऱ्यांनाही फटका बसला होता. त्याची जाणीव ठेवून महत्त्वाच्या या दूधगंगा काठावरील लढ्यामध्ये तिरंगा काठावरील नागरिक व शेतकऱ्यांचाही पाठिंबा महत्वपूर्ण आहे.
—————
सीमाभागाला ४ टीएमसी पाणी मिळणारच
महाराष्ट्रातील दूधगंगा नदीच्या द्वारे इचलकरंजी पाणी योजनेला पाणी देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तरीही सीमा बघायला चार टीएमसी पाणी मिळणारच इचलकरंजी प्रकल्पामुळे  सीमाभागातील कर्नाटकातील ९ गावातील पाणी योजनेला काही अंशी फटका बसणार आहे.
—-
‘इचलकरंजी पाणी प्रकल्पामुळे कर्नाटक सीमाभागातील नऊ गावातील पाणी योजनांना काही प्रमाणात फटका बसणार आहे. त्यामुळे योजनेला विरोधासाठी यापूर्वी झालेल्या आंदोलनात या भागातील शेतकरी व नागरिक सहभागी झाले होते. वरील गावातील शेतकरी व पाणी योजना वर अन्याय होत असल्यास आपण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.’
– वीरकुमार पाटील, माजी ऊर्जामंत्री, कोगनोळी

About Belgaum Varta

Check Also

शेतकऱ्यांनी न्याय, हक्कासाठी अधिवेशनातील मोर्चात सहभागी व्हावे

Spread the love  राजू पोवार यांचे भावनिक आवाहन : ‘रयत’च्या पदाधिकाऱ्यांची निपाणीच बैठक निपाणी (वार्ता) …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *