Thursday , June 4 2026
Breaking News

सीमाप्रश्नी उद्याची सुनावणी पुन्हा लांबणीवर

Spread the love

 

नवी दिल्ली : बुधवार दिनांक 23 रोजी सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नी महत्त्वपूर्ण सुनावणी होणार होती. सदर सुनावणी न्यायाधीश अन्य खंडपीठाच्या कामात व्यस्त असल्यामुळे महत्त्वपूर्ण सुनावणी लांबणीवर पडली. त्यानंतर उद्या 30 नोव्हेंबर रोजी होणारी सुनावणी ही न्यायाधीश रजेवर असल्यामुळे लांबणीवर पडली आहे.
उद्याच्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आज मंगळवारीच दिल्लीत पोहोचले आहेत. दिल्लीतील वास्तव्यादरम्यान मुख्यमंत्री बोम्मई सीमाप्रश्नी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व अन्य बड्या नेत्यांच्या भेटी घेणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

About Belgaum Varta

Check Also

राजश्री एग्रीवेंचर, शिवसेनेतर्फे सुळगा (उ.) येथील सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी मुला-मुलींच्या शाळेमध्ये वह्यांचे वाटप

Spread the love  बेळगाव तालुक्यातील सुळगा (उ.) येथील सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी मुला-मुलींच्या शाळेमध्ये राजश्री …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *