सौंदलगा : येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये मिनी गुरुकुल प्रकल्पांतर्गत विविध प्रकल्प राबवले जातात. त्या पद्धतीने मुख्याध्यापक जे. एस. वाडकर यांच्या मार्गदर्शनानुसार विभाग प्रमुख श्री. एस. व्ही. यादव व सहाय्यक शिक्षिका सविता कुरले यांनी क्षेत्रभेटीसाठी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शेतावर नेऊन कांदा लावणीचा अनुभव घेतला.
यावेळी सौंदलगा येथील प्रगतशील शेतकरी व ग्रामपंचायतचे सदस्य श्री. चंद्रकांत गोविंद पाटील यांच्या शेतावर विद्यार्थी व विद्यार्थिनी कांदा लागवड केली. यावेळी विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना अनेक प्रश्न विचारले त्यामध्ये कांदा लावण्याचा खर्च किती? एकूण किती तरू लागते? उत्पन्न किती रुपये येते? उत्पादनाचा कालावधी किती? औषधे रासायनिक खते कोणती व कशी वापरतात? कांद्यामध्ये मिश्र पीक कोणते घेतले जाते? या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शेतकरी शशिकांत पाटील व चंद्रकांत पाटील यांनी दिली सर्व विद्यार्थ्यांनी या प्रकल्पाबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी शेतकऱ्यांकडून विद्यार्थ्यांना अल्पोपहार देण्यात आला. यानंतर प्रकल्प प्रमुख एस. व्ही. यादव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
शेवटी पूजा काळुगडे, ऋषिकेश महाडक, प्रणव कुंभार या विद्यार्थ्यानी आपल्या मनोगतातून या प्रकल्पाविषयी समाधान व्यक्त केले. सहाय्यक शिक्षिका सविता कुरले यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta