कोगनोळी : कागल येथील छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याच्या वतीने एक रकमी 2993 रुपये उच्चांकी दर जाहीर केल्याबद्दल येथील सुतार गल्ली, लोखंडे गल्लीतील ऊस उत्पादक शेतकर्यांच्या कडून माजी मंत्री वीरकुमार पाटील यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.
विलास लोखंडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
यावेळी बोलताना माजी मंत्री वीरकुमार पाटील म्हणाले, छत्रपती शाहू कारखान्याचे चेअरमन समरजितसिंह घाटगे यांनी ऊस उत्पादक शेतकर्यांचे हित जोपासले आहे.
कारखान्याच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक विकासात्मक कार्यक्रम राबवून ऊस उत्पादक शेतकरी व सभासदांना दिलासा दिला आहे. छत्रपती शाहू कारखान्याची उच्चांकी दराची परंपरा कायम ठेवली आहे.
यावेळी अशोक हेंगाडे, बाबुराव कदम, शिवाजी लोखंडे, बाबुराव वरुटे, संजय शिंगे, बाबुराव सुतार, बाळासाहेब पाटील, सुरेश लोखंडे, दत्तात्रय लोखंडे, शहाजी लोखंडे, भिमराव लोखंडे, केरबा लोखंडे, मारुती सुतार, प्रकाश कदम यांच्यासह अन्य मान्यवर, ग्रामस्थ, ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
Check Also
जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे
Spread the love पाणी प्रश्नासाठी आत्मक्लेष आंदोलन; जिल्हाधिकारी कार्यालयातून येणार कमिटी निपाणी (वार्ता) : येथील …