बेळगाव : बेळगाव शहरातील श्री दुर्गामाता मूर्तींचे विसर्जन शासनाने दिलेल्या नियोजित वेळेतच करा अश्या सूचना पोलीस अधिकार्यांनी केल्या सर्वच पोलीस स्थानकानी त्या त्या पोलीस स्थानक हद्दीतील मंडळांना तश्या सूचना केल्या आहेत.
कोरोनाचे संकट कायम असल्याने यंदाचा दसरा उत्सव साध्या पद्धतीने शांततेत साजरा करावा आणि कोणत्याही परिस्थितीत श्री दुर्गामाता मूर्तीचे विसर्जन सायंकाळी 5 वाजण्यापूर्वी करावे, अशी सक्त सूचना मार्केट पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मल्लिकार्जुन तुळसीगेरी यांनी केली आहे. दसरा सण आणि सीमोल्लंघन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर मार्केट पोलीस स्थानक येथे आयोजित केलेल्या शहरातील विविध मंडळांच्या पदाधिकार्यांच्या बैठकीमध्ये पोलीस निरीक्षक तुळसीगेरी बोलत होते. कोरोनाचे संकट अद्याप कळलेले नाही. त्यामुळे प्रशासनाने घालून दिलेल्या नियमानुसार दसरोत्सव साजरा करावा. मिरवणुकीला बंदी असल्यामुळे साध्या पद्धतीने श्री दुर्गामाता मूर्तीचे विसर्जन केले जावे. श्री दुर्गादेवी मूर्ती विसर्जनासाठी सायंकाळी 5 वाजेपर्यंत मुदत देण्यात आली असली तरी तत्पूर्वी मूर्तींचे विसर्जन करण्यात यावे. डॉल्बी वगैरे साऊंड सिस्टिमचा वापर केला जाऊ नये, पालख्या देखील वेळेत काढाव्या आदी सूचना देऊन सर्वांनी शांततेने सण साजरा करून पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक मल्लिकार्जुन तुळसीगेरी यांनी बैठकीत केले.
बैठकीस मार्केट पोलीस स्थानक व्याप्तीतील विविध मंडळांचे पदाधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते. त्यांनी विचारलेल्या शंकांचे निरसन पोलीस अधिकार्यांनी केले. दरम्यान शहरातील मार्केट, खडेबाजार आदी विविध पोलीस स्थानकांमध्ये बैठका झाल्या असून प्रत्येक बैठकीत श्री दुर्गामाता मूर्तीचे विसर्जन सायंकाळी 5 वाजण्यापूर्वी करण्याची सूचना पोलीस अधिकार्यांनी मंडळांच्या पदाधिकार्यांना दिली आहे.
Check Also
चांगळेश्वरी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड
Spread the love बेळगाव : बेळगाव तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ संचालित श्री …