मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते पुरस्कार : निपाणीच्या शिरपेचात मानाचा तुरा
निपाणी : निपाणीचा सुपूत्र व बेळगाव जिल्ह्यामधील अष्टपैलू क्रिकेटपटू, सामनावीर व सर्वोत्कृष्ट पुरस्काराचा मानकरी नरेंद्र बाळकृष्ण मांगूरे याने उत्तर प्रदेश येथे झालेल्या बीसीसीआय आयोजित टी -20 अखिल भारतीय दिव्यांगाच्या लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत साऊथ झोन क्रिकेट संघाला विजेतेपद मिळवून देण्यासाठी सिंहाचा वाटा उचलला.
राज्य दिव्यांग क्रिकेट बीसीसीआयच्या मान्यतेने उत्तर प्रदेश संघटना आयोजित केलेल्या अखिल भारतीय दिव्यांगांच्या राष्ट्रीय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत साऊथ झोन, नॉर्थ झोन, ईस्ट झोन, वेस्ट झोन या दिव्यांगांच्या संघांनी भाग घेतला होता. झोन साऊथ विभागातून तामिळनाडू, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश राज्यांचा समावेश होता. या राज्यातून बीसीसीआयच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांग संघाची निवड करण्यात आली होती. अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करतांना नॉर्थ झोन संघाने 15 षटकात सर्व गडी गमावून 70 धावा काढल्या. त्याच्या उत्तरादाखल खेळतांना साऊथ झोनने 7 षटकात 2 गडी गमावून 71 धावा काढल्या.
साऊथ झोन संघातर्फे शिव (बेंगलोर) 20 धावा, सतीश (गदग) 20 धावा तर नरेंद्र मांगूरे (निपाणी) याने अष्टपैलू खेळी खेळतांना गोलंदाजीत 3 षटकात 8 धावा देऊन 4 गडी बाद केले. तर फलंदाजी करतांना 3 चौकारासह 18 धावा काढल्या. अंतिम सामन्यानंतर झालेल्या बक्षिस वितरण समारंभात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते नरेंद्र मांगूरे यांना अंतिम सामनावीर व सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा पुरस्कार देण्यात आला.
Check Also
पुर्वीप्रमाणे पाणी बील आकारणीचा पहिला ठराव मंजूर करावा
Spread the love निपाणी (वार्ता) : येथील नगरपालिकेच्या नुतन पदाधिकाऱ्यांची पहिली सर्व साधारण सभा मंगळवारी …