निपाणी : भारतभूमीच्या स्वातंत्र्य प्राप्तीनंतर म्हैसूर राज्याची (कर्नाटक) निर्मिती 1956 साली झाली. येथील मराठी भाषिक भाग अन्यायाने केंद्र सरकारने कर्नाटकात समाविष्ट केला. हा वादग्रस्त भाग पुर्वीप्रमाणे महाराष्ट्रातच समाविष्ट करावा अशा मागणीचा जनतेचा लढा सुरू असताना त्यावेळी झालेल्या पोलिस गोळीबारात निपाणी येथे कमळाबाई मोहिते (निपाणी) व गोपाळ आप्पू चौगुले (बारवाड) यांचे निधन झाले. याच बरोबर सीमाभागात अनेकांनी आपल्या प्राणाची आहूती दिली त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी दरवर्षी 17 जानेवारी हा दिवस सीमाभागात गांभीर्याने शांततेत पाळण्यात येतो. निपाणी शहर व भागातील नागरिकांनी आपले दररोजचे व्यवहार, कामकाज, दुकाने बंद ठेवून या लढ्यात आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन निपाणी विभाग म. ए. समितीने केले आहे.
मंगळवार दि. 17 जानेवारी रोजी सकाळी ठीक 10.30 वाजता बॅ. नाथ पै. चौक (बेळगांव नाका) येथे अभिवादन करून मूकफेरीने साखरवाडी येथे 11.00 वाजता हुतात्म्यांना अभिवादन करण्यात येणार आहे. यावेळी निपाणीतील आजी -माजी लोकप्रनिधी व सकल मराठी भाषिक उपस्थित राहणार आहेत.