विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचा इशारा: तहसीलदारांना निवेदन
निपाणी (वार्ता) : हिंदू संघटना, त्यांचे कार्यकर्ते आणि हिंदू नेत्यांवर हल्ले आणि हत्या झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. ८ जानेवारी २०२३ रोजी आसाममधील करीमगंज जिल्ह्यातील लोवीरपुरा येथे शंभू कैरी या १६ वर्षीय बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची एका जिहादीने निर्घृणपणे चाकू भोसकून हत्या केली. आरोपीवर योग्य ती कार्यवाही करावी, अन्यथा आंदोलन छेडला जाईल असा इशारा बजरंग दलातर्फे घेण्यात आला.
याबाबत तहसीलदार कार्यालयाला निवेदन देण्यात आले.
निवेदनातील माहिती अशी, गेल्या २ वर्षात केवळ बजरंग दलाच्या ९ कार्यकर्त्यांची हत्या झाली असून ३२ कार्यकर्त्यांवर हल्ले झाले आहेत. नुकतीच दिल्लीत घडलेली घटनाही चिंता वाढवणारी आहे. वाढत्या हाल्या आतापर्यंत झालेल्या हत्या मागे दोन मारेकरी आहे. एका हिंदूची निर्घृण हत्या केली आणि त्याचे ३२ तुकडे केल्यावर अनेक हिंदू नेतेही त्याचे लक्ष्य असल्याचे सांगितले जात आहे. तरी केंद्र सरकारने लवकरात लवकर गुन्हेगारांना कठोरात कठोर फाशीची शिक्षा देण्यात यावी. अन्यथा विश्व हिंदू परिषद बजरंग दल मार्फत जगभर जन आक्रोश आंदोलन छेडण्यात येईल व येणाऱ्या संकटाला न्यायव्यवस्था व केंद्र सरकार कारणीभूत ठरेल, असा इशारा संघटनेच्या मार्फत देण्यात आला.
यावेळी श्री वीरुपक्षलिंग समाधी मठाचे मठाधीश प्रणालींग स्वामी, अजित पारळे यांच्या हस्ते तहसीलदार कार्यालयाला निवेदन दिले. अभिजीत भोंगाळे यांनी निवेदन स्वीकारून वरिष्ठाकडे पाठवण्याचे आश्वासन दिले.
यावेळी सुचित्रा कुलकर्णी, युवराज जाधव, प्रवीण चव्हाण, अमोल चेंडके, सचिन जाधव, सागर श्रीखंडे, विनायक पावले, अजित पाटील, श्रीनिवास पोवार, सुमित जाधव, केशव कराळे, रोहन पोवार, आशिष वाघमोडे, शुभम गिरी व कार्यकर्ते उपस्थित होते. श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय, हर हर महादेव, बोलो भारत माता की जय, आर्य सनातन वैदिक हिंदू धर्माचा विजय असो, अशा घोषणा देऊन परिसरात दणाणून सोडला.
Belgaum Varta Belgaum Varta