
पुरुष 40 तर महिलांचे 10 संघ सहभागी : प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
निपाणी (वार्ता) : बालवीर स्पोर्ट्स क्लब आयोजित अरिहंत उद्योग समूह व उत्तम पाटील युवाशक्ती यांच्यातर्फे राष्ट्रीय पातळीवरील व्हॉलीबॉल स्पर्धेतील पुरुष गटात अंतिम सामन्यात पुणे संघाने प्रथम क्रमांक मिळवून अरिहंत चषक, सुवर्णपदक आणि रोख 25 हजाराचे बक्षीस मिळविले. तर महिला गटात स्पोटर्स अथाॅरेटी ऑफ केरळ संघाने प्रथम क्रमांक पटकावून 25 हजार रुपये, अरिहंत चषक मिळविला. त्यांना उत्तम पाटील, प्रतीक पाटील, बच्चू पाटील व मान्यवरांच्या हस्ते बक्षीसे दिली.
स्पर्धेत पुरुष गटात अमरावती संघाने व्दितीय तर कोल्हापूर संघाने तृतीय क्रमांक मिळविला. पुरुष व महिला विभागातील दोन्ही अंतिम सामने चुरशीने झाले. त्यामुळे प्रेक्षकांची गर्दी झाली होती. वुमेन्स ऑफ टूर्नामेंटचा सन्मान गुजरातच्या शुक्ला या खेळाडूला मिळाला.
मंगळवारी सकाळच्या सत्रात महिला विभागात उपांत्य सामना भिलवडी आणि कर्नाटक राज्य यांच्यात झाला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या सामन्यात 3 विरुद्ध 1 सेटने भिलवडी संघाने कर्नाटक संघाचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला.
दुसरा उपांत्य सामना स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया केरळ आणि स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया गुजरात यांच्यात रंगला. तब्बल दोन तास 21 मिनिटे झालेल्या या सामन्यात केरळ संघाने 3 विरुद्ध 2 अशा सेटने गुजरात संघाचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. पुरुष विभागातील पहिला उपांत्य सामना अमरावती विरुद्ध कोल्हापूर संघात झाला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या सामन्यात सुरुवातीच्या सत्रात दोन्ही संघांनी 2-2 सेट जिंकले. यानंतर पाचव्या निर्णायक सेटमध्ये कोल्हापूर संघाचा प्रतिकार मोडत अमरावती संघाने पाचवा सेट जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला.
दुसरा उपांत्य सामना पुणे विरूद्ध सांगली संघ यांच्यात झाला. यात पुणे संघाने 3-0 अशा सेटने विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश मिळवला.
स्पर्धेतील महिला संघांमध्ये पुणे संघाने तनवी देशपांडे आणि वेदिका शिंदे त्यानंतर गुजरात संघामध्ये पूर्णा शुक्ला या आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सहभाग होता तर केरळ संघामध्ये तब्बल आठ राष्ट्रीय खेळाडू सहभागी झाले होते. स्पर्धेमध्ये राष्ट्रीय पंच म्हणून रामानंद गोसावी, दीपक चव्हाण, अमोघ गोरे, मारुती काशीद यांनी पंचांची कामगिरी चोखपणे बजावली.
यावेळी मीनाक्षी पाटील, धनश्री पाटील, विनयश्री पाटील, प्रतीक पाटील, माजी आमदार प्रा. सुभाष जोशी, राजकुमार सावंत, पुष्कर तारळे, नगरसेवक रवींद्र शिंदे, संजय सांगावकर, प्राचार्य पी. पी. शाह, प्रा. बाळासाहेब सूर्यवंशी, सुधाकर सोनाळकर, प्रा.शिवाजी मोरे, निरंजन पाटील, गजानन कावडकर, इम्रान मकानदार, शिरीष कमते, सुंदर पाटील, दिलीप पठाडे, प्रकाश शहा, वीरल शहा, यशवंतदादा पाटील, शिवाजी मोरे, अनिता पठाडे, अमर नलवडे, बंडा हातनूरे, संजय सांगावकर, रवींद्र शिंदे, शौकत मणेर, शेरू बडेघर यांच्यासह निपाणी, बोरगाव नगरपालिकेचे आजी, माजी नगरसेवक, विविध संघ, संस्थाचे पदाधिकारी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta