Share
आपच्या पाठपुराव्याला यश : ग्रामस्थांमधून समाधान
निपाणी (वार्ता) : अमलझरी गावाची निपाणी सब रजिस्टर कार्यालयामध्ये नोंद व्हावी, यासाठी ग्रामस्थांकडून तीन वर्षांपासून लढा चालू होता. तरीही कोणत्याही राजकीय पक्षाकडून अथवा पक्ष प्रमुखाकडून या विषयी निवेदन देऊन सुध्दा दखल घेतली गेली नाही. अमलझरी ग्रामस्थ त्यांच्यावर होत असलेल्या अन्याय सहन करत विवंचनेत पडले होते. त्याची दखल घेऊन आम आदमी पक्षाच्या येथील पदाधिकाऱ्यांनी डॉ. राजेश बनवन्ना यांच्या नेतृत्वाखाली संबंधित कार्यालयाला पाठपुरावा करून अखेर या गावची सब रजिस्टर कार्यालयाला नोंद झाली. त्यामुळे ग्रामस्थातून समाधान व्यक्त होत आहे.
सब रजिस्ट्रार, तहसीलदार, प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी, मंत्रालय, लोकप्रतिनिधीसह संबंधित खात्यांना ग्रामपंचायत ठराव व कागदपत्रे पाठवून देखील कोणीच याची दखल घेतली नव्हती. त्यामुळे ग्रामस्थांनी आपले गाव सब रजिस्टर दफ्तरी नोंद नाही. याबाबत चौकशी करण्यासाठी आम आदमी पक्षाच्या येथील पदाधिकाऱ्यांना विनंती केली होती. त्यानुसार गंभीर दखल घेऊन या पदाधिकाऱ्यांनी संघटित होऊन निवेदन देण्यासह या विषयाचा सातत्याने प्रयत्न करुन न्याय मिळवून दिला. याशिवाय अमलझरी ग्रामस्थांवर होत असलेल्या अन्याय संविधानीक पद्धतीने लढून त्यांना न्याय मिळवून देण्याचे कार्य आम आदमी पक्षातर्फे करणार असल्याचे डॉ. बनवन्ना यांनी सांगितले. अमलझरी ग्रामस्थांना जो न्याय मिळवून दिला त्याबद्दल अमलझरी ग्रामस्थांकडून आम आदमी पक्षातर्फे कार्यकर्त्यांचा सत्कार झाला. यावेळी आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते आदर्श गिजवणेकर, वसिम पठाण, नंदकिशोर कंगळे, अक्षय कार्वेकर, राजू हिंग्लजे, योगेश कुरणे, शंकर चौगुले यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
Post Views:
913
Belgaum Varta Belgaum Varta