Share
आमदार चन्नराज हट्टीहोळी :अक्कोळमध्ये समुदाय भवनाचे भूमिपूजन
निपाणी (वार्ता) : विधानसभा परिषद निवडणुकीत या भागातील नागरिकांनी आपल्याला संधी दिली आहे. निवडणुकीच्या वेळी दिलेल्या आश्वासनानुसार सध्या कामाला सुरुवात केली आहे. निपाणी भागातील विविध विकास कामासाठी आपण प्रयत्नशील आहोत, अशी ग्वाही विधानपरिषद सदस्य आमदार चन्नराज हट्टीहोळी यांनी दिली.
अक्कोळ येथे त्यांनी आपल्या फंडातून छत्रपती शिवाजी तरुण मंडळाच्या भवनसाठी ३ लाखाचा निधी मंजूर केला आहे. या कामाचे भूमिपूजन करून ते बोलत होते.
व्यासपीठावर निपाणी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, बेडकीहाळ ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष बसवराज पाटील, युवा नेते पंकज पाटील, युवा नेते सुजय पाटील, मृणाल हेब्बाळकर, वैभव पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी मराठा समुदाय भवनासाठी निधी मिळावा, यासाठी आमदार चन्नराज हट्टीहोळी यांना निवेदन देण्यात आले.
कार्यक्रमास निपाणी ब्लॉक युवक काँग्रेस अध्यक्ष अवधूत गुरव, शहर युवक काँग्रेस अध्यक्ष प्रतीक शाह,धनाजी चव्हाण,निवृत्ती वारके, जितेंद्र सुर्वेभारमल, विश्वास कुंभार, संपत स्वामी, सुधाकर चव्हाण, रामा बन्ने, चंद्रकांत मुधाळे, दीपक कोळी राजेंद्र सुतार, प्रदीप पाटील, बाळासाहेब घस्ते, सुरेश मोहिते, सुहास पठाडे, मारुती शिंदे, अशोक राऊत, बाबासाहेब किल्लेदार यांच्यासह मंडळाचे सदस्य व काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. राजेंद्र पोवार यांनी आभार मानले.
Post Views:
632
Belgaum Varta Belgaum Varta