
धार्मिक कार्यक्रमासह शर्यती, कुस्ती मैदान : लेझीम स्पर्धेचे आकर्षण
निपाणी (वार्ता) : शेंडूर येथील श्री रासाई, भैरवनाथ यात्रा रविवारपासून (ता.१२) सुरू होणार आहे. यात्रेनिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच विविध शर्यतींचे आयोजन केल्याची माहिती यात्रा कमिटीने दिली.
रविवारी (ता. १२) सकाळी ६ वाजता श्री भैरवनाथ देवास अभिषेक व जागर, सकाळी ९ ते १२ पर्यंत दंडवत, आरती व गोडा नैवेद्य, सोमवार १३ रोजी सायंकाळी ७ ते १२ देवीची पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. मंगळवारी (ता. १४) रोजी सकाळी ९ ते १२ रासाई देवी दंडवत, आरती व गोडा नैवेद्य होणार आहे. या दिवशी लेझीम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मोठ्या गटासाठी अनुक्रमे ११,००१, ७५०१, ५५०१ रुपये, तसेच उत्तेजनार्थ ३००१ रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. तर लहान गटासाठी अनुक्रमे ११,००१, ७५०१ आणि ५५०१ रुपये आणि ३००० रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. मोठा आणि लहान गटातील उत्कृष्ट हलगीवादकांसाठी १००१ रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे.
सोमवारी(ता. १३) श्वान पळवणे स्पर्धासाठी अनुक्रमे ३००० रुपये,तीन फुटी ढाल, २००० रुपये दोन फुटी ढाल, १००० रुपये, एक फुटी ढाल, ७०० रुपये, ५०० रुपये आणि ४०० रुपये अशी बक्षिसे दिली जाणार आहेत.
बुधवारी (ता. १५) सकाळी ९ वाजता विनालाठीकाठी शर्यती होणार आहेत. जनरल बैलगाडी शर्यतीसाठी २१०००, १५०००, ११००० रुपये, जनरल घोडागाडी शर्यतीसाठी ११००१, ७०००, ५००० रुपये, नवतर घोडागाडी शर्यतीसाठी ७०००, ५०००, ३००० रुपये अशी बक्षिसे दिली जाणार आहेत. सायंकाळी ४ वाजता निकाली कुस्तीचे मैदान होणार आहे. प्रथम क्रमांकाच्या कुस्तीसाठी चांदीची गदा व रोख बक्षीस, दुसऱ्या नंबरच्या कुस्तीसाठी मोठी ढाल आणि रोख बक्षीस दिले जाणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta