निपाणी (वार्ता) : राष्ट्रीय पातळीवर काम करणार्या राजस्थान येथील बडीखाटू जायल येथील संत कबीर आश्रम सेवा संस्थान यांच्यावतीने देण्यात येणारा यंदाचा राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार देऊन निपाणीतील नगरसेवक शौकत मनेर यांना गौरवण्यात आले. मनेर यांच्या सामाजिक सेवेची दखल घेऊन हा पुरस्कार 5 फेब्रुवारी रोजी नवी दिल्ली येथील डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र 16 जनपथ येथे मान्यवरांच्या उपस्थितीत वितरण करण्यात आला.
संत कबीर यांच्या 505 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कबीर कोहिनूर सन्मान समारंभ पार पडला. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय चहा मंडळाचे सदस्य डॉ. नानकदास महाराज हे या आश्रम सेवा संस्थानचे संस्थापक आहेत. प्रत्येक वर्षी सामाजिक कार्यात योगदान देणार्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. यंदा हा पुरस्कार नगरसेवक शौकत मनेर यांना दिला. त्यांच्या या पुरस्कारामुळे सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.
यावेळी महंत नरेंद्र, कवी शशिकांत यादव, भामाशाह कुलरिया,रामधन पोतलिया, डॉ. परीन सोमाणी, पद्मश्री हिम्मतराम भांबू, महंत सुधीरदास महाराज, आचार्य पंकज कृष्णाजी-महाराज, आचार्य विखरदास महाराज, आचार्य डॉ. लोकेश मुनीजी महाराज, खासदार बालकनाथजी महाराज, माजी केंद्रीय मंत्री सी. आर. चौधरी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta