
निपाणी (वार्ता) : शहर आणि परिसरामध्ये महापुरूषांचे लहान मोठे पुतळे आणि चौक आहेत. त्या स्थळावर नगरपालिकेच्या वतीने त्यांच्या नावाचे फलक लावण्यासाठी कार्य लिहावे. तेथील परिसर दररोज स्वच्छ व सुंदर ठेवावा. महापुरुषांचा एकेरी भाषेमध्ये होणारा उल्लेख टाळावा. यासह विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी नगरपालिकेने प्रयत्न करावे. अन्यथा श्रीराम सेना हिंदुस्थान यांच्या वतीने उग्र आंदोलन करण्यात येईल, अशा प्रकारचे निवेदन नगरपालिका अधिकार्यांना देण्यात आले. अधिकार्यांनी निवेदन स्वीकारून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. यावेळी श्रीराम सेना हिंदुस्थानचे जिल्हा अध्यक्ष अॅड. निलेश हत्ती, गणेश भोसले, नरेश मोडीकर, व्यंकटेश भांडारी, आकाश चव्हाण, रोहित पाटील, भरत शिंदे, प्रशांत खराडे, दीपक खापे, राहुल वाघेला, लखन बीळगेकर, निलेश शेलार, निहाल चराटे, प्रकाश मस्कर, तुषार नागावकर, हर्षल पोतदार, सिद्धार्थ, सुजल औंधकर, श्री. मानकर, गजानन खापे, ओंकार बेडगे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta