Tuesday , March 3 2026
Breaking News

निपाणीत उद्यापासून “अरिहंत चषक” क्रिकेट स्पर्धेचा थरार

Spread the love
उत्तम पाटील यांची माहिती : चार लाखाची बक्षीसे
निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील अरिहंत उद्योग समुहाच्या सहकार्याने निपाणी येथील टॉप स्टार स्पोर्ट्स क्लबतर्फे येथील म्युनिसिपल हायस्कूलच्या मैदानावर शनिवारपासून (ता.११) अरिहंत चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. रात्रंदिवस प्रकाश झोतात आयोजित या स्पर्धेतील विजेत्या उपविजेत्या संघासह इतर वैयक्तिक बक्षिसे मिळून चार लाख रुपयाचे बक्षीस देण्यात येणार आहेत. या स्पर्धेचा निपाणी आणि परिसरातील क्रिकेट प्रेमींनी लाभ घ्यावा, असे आवाहन उत्तम पाटील यांनी केले आहे.
उत्तम पाटील म्हणाले, शहर व परिसरातील स्थानिक क्रिकेटपटूंना संधी मिळावी. नवोदय ते खेळाडू मधून राष्ट्रीय पातळीवरचे खेळाडू घडावेत या उद्देशाने अरिहंत उद्योग समूहाच्या सहकार्याने या स्पर्धा आयोजित केल्या आहेत. या स्पर्धाी इंडियन प्रिमियर लिंग या धर्तीवर खेळविण्यात येणार आहेत. शहर व परिसरातील गुणवंत खेळाडूंना आपली चमक दाखविण्याची या स्पर्धेमध्ये संधी मिळणार आहे.
सदरच्या स्पर्धा टेनिस बॉलवर खेळविल्या जाणार आहेत. स्पर्धेतील विजेत्या संघाला १ लाख रुपये आणि व चषक, उपविजेत्या संघाला ७५ हजार व चषक पर उपांत्य फेरीतील दोन्ही पराभूत संघाना प्रत्येकी २५ हजार रुपये व चषक देण्यात येणार आहे. अंतिम सामन्यातील मॅन ऑफ द मॅचसाठी ५ हजार रुपये व चषक, उत्कृष्ट गोलंदाज आणि फलंदासाठी प्रत्येकी २५०० रुपये व चषक याशिवाय मॅन ऑफ द सिरीजसाठी सायकल व चषक, प्रत्येक सामन्यातील सामनावीरांसाठी आकर्षक चषक देण्यात येणार आहे. तरी इच्छुक संघानी दिलीप घाटगे, बबलू मांगोरे, महेश कांबळे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘पंचहमी’ योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी सहकार्य करावे

Spread the love  गॅरंटी योजना कमिटी अध्यक्ष रमेश जाधव ; निपाणी तालुका पातळीवरील बैठक निपाणी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *