मान्यवरांची उपस्थिती : चार लाखाची बक्षीसे
निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील अरिहंत उद्योग समुहाच्या सहकार्याने निपाणी येथील टॉप स्टार स्पोर्ट्स क्लबतर्फे येथील म्युनिसिपल हायस्कूलच्या मैदानावर आयोजित अरिहंत चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन शनिवारी (ता.११) बोरगाव येथील अरिहंत सौहार्द संस्थेचे अध्यक्ष उत्तम पाटील यांच्या हस्ते झाले. व्यासपीठावर माजी आमदार प्रा. सुभाष जोशी, दलित क्रांती सेनेचे संस्थापक अशोककुमार असोदे, नगरसेवक रवींद्र शिंदे, संजय सांगावकर, संजय पावले, दत्ता नाईक, शौकत मनेर, ॲड. अमर शिंत्रे, मैनुद्दीन मुल्ला, गजानन कावडकर, दीपक सावंत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
उत्तम पाटील म्हणाले, अरिहंत उद्योग समूहाच्या माध्यमातून राजकारणाला जोड देत सामाजिक कार्य निरंतरपणे सुरू आहे. कोरोना काळात मतदार संघातील सर्वच गावात भेट देऊन नागरिकांना दिलासा देण्याबरोबरच त्यांना संकटकाळी मदत केली आहे. त्याची नागरिकांनी जाण ठेवली पाहिजे. या पुढील काळात सर्वसामान्य नागरिकांना एकत्रित येऊन आपण पुढील वाटचाल करणार असल्याचे स्पष्ट केले.
माजी आमदार प्रा. सुभाष जोशी यांनी, सामाजिक कार्याबरोबरच क्रीडा क्षेत्राला प्राधान्य देण्याचे काम अरिहंत उद्योग समूहाच्या माध्यमातून होत आहे. याशिवाय निपाणी भागातील क्रीडा संस्कृती जपण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यांना आमदार होण्यासाठी सर्वांचे सहकार्य असल्याचे सांगितले. यावेळी अशोककुमार असोदे यांनीही मनोगत व्यक्त केले.
स्पर्धेतील विजेत्या संघाला १ लाख रुपये आणि व चषक, उपविजेत्या संघाला ७५ हजार व चषक पर उपांत्य फेरीतील दोन्ही पराभूत संघाना प्रत्येकी २५ हजार रुपये व चषक देण्यात येणार आहे. अंतिम सामन्यातील मॅन ऑफ द मॅच साठी ५ हजार रुपये व चषक, उत्कृष्ट गोलंदाज आणि फलंदासाठी प्रत्येकी२५०० रुपये व चषक याशिवाय मॅन ऑफ द सिरीज साठी सायकल व चषक, प्रत्येक सामन्यातील सामनावीरांसाठी आकर्षक चषक देण्यात येणार आहे.
कार्यक्रमास अरुण निकाडे, अमर शिंत्रे इमरान मकानदार शिरीष कमते, नितीन साळुंखे, चेतन स्वामी, गजानन कावडकर, महादेव लवटे, महादेव भोरे, सागर पिंपळे, आकाश पाटील, अरुण जाधव, अमित शिंदे, सुधाकर माने, अरविंद पारळे, महेश बुवा, विकास चव्हाण, लहू मधाळे, आनंदा कुंभार, धनंजय मोकाशी, अशोक बंकापुरे आर. टी. चौगुले, आर. एम. बन्ने यांच्यासह क्रिकेट प्रेमी उपस्थित होते. सचिन फुटाणकर यांनी सूत्रसंचालन केले. अनिल भोसले यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta