कर्नल संजीव सरनाईक : छात्रसेना व्हाईट आर्मीचा पारितोषिक समारंभ
निपाणी (वार्ता) : देशसेवेचे स्वप्न पाहत असताना खडतर परिश्रम आणि उच्च प्रतीच्या त्यागाची तयारी आपण ठेवली पाहिजे. मगच आपण उच्च पदापर्यंत पोहोचू शकतो. त्यासाठी एनसीसी मध्ये पाया भक्कम केला जातो. शिस्त लावल्याने आपण देशसेवेच्या कार्यात स्वतःला झोकून देऊ शकतो. यामध्ये देवचंद महाविद्यालय अर्जुननगर येथील छात्रसेना विभागाचा फार मोठा वाटा आहे, असे मत कर्नल संजीव सरनाईक यांनी व्यक्त केले. अर्जुननगर (ता.कागल) येथील देवचंद महाविद्यालय छात्रसेना व व्हाईट आर्मी विभागाचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम झाला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कर्नल संजीव सरनाईक बोलत होते.
यावेळीअशोक रोकडे यांची प्रमुख उपस्थिती होती. मेजर डॉ.अशोक डोनर यांचे विशेष कौतुक केले.
व्हाईट आर्मीचे प्रमुख अशोक रोकडे यांनी व्हाईट आर्मीमध्ये देवचंद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल प्रशंसा केली. त्याचबरोबर व्हाईट आर्मीमध्ये उच्च प्रतीचे श्रमसंस्कार आणि दुसऱ्यांना मदत करण्याची भावना यांचे महत्त्व स्पष्ट केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य प्रो. डॉ.प्रशांत शाह म्हणाले, सर्व यशस्वी आणि गुणवंत विद्यार्थ्यांनी एनसीसी व व्हाईट आर्मी द्वारे देवचंद महाविद्यालयाच्या नावलौकिकात विशेष भर घातलेली असून त्यांचे जे सत्कार करण्यात आले हे त्यांना भविष्यातील त्यांच्या ध्येयासाठी संजीवनी देणारे ठरतील.
याप्रसंगी महाविद्यालयाच्या उपप्राचार्य प्रो. डॉ. जी. डी. इंगळे, उपप्राचार्य अशोक पवार, पर्यवेक्षक प्रभाकर जाधव सर्व एनसीसी छात्र आणि व्हाईट आर्मीतील छात्र मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मेजर डॉ.अशोक डोनर यांच्या प्रास्ताविकाने झाली. सर्व पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या मध्ये विक्रम भोसले, तेजश्री पाटील, राणी गुरव, शुभम चव्हाण, प्रथमेश मलाबादे यांनी मनोगत व्यक्त केली.
सूत्रसंचालन राणी गुरव, मयुरी चौगुले यांनी सूत्रसंचालन केले तर सलोनी जबडे हिने आभार मानले.
सहाना जमादार, विक्रम भोसले, प्रतीक कामते, आदेश जाधव, विनायक बोटे, युवराज आदमपुरे, अथर्व पाटील, प्रथमेश पाटील, ओंकार खोत, तेजश्री पाटील, शेखर चव्हाण, साक्षी रणदिवे, वैष्णवी तेलवेकर, कांचन चौगुले, राणी गुरव, आकांक्षा आरडे, प्रेरणा माळी, वैष्णवी चौगुले, अमित कांबळे, सौरभ पोटले यांनी पुरस्कार पटकाविले.
Belgaum Varta Belgaum Varta