हंचिनाळ : श्री हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखाना लिमिटेड निपाणी यांच्यामार्फत येथे ऊस विकास चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यावेळी ऊस विकास अधिकारी विश्वजीत पाटील यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आडी हंचिनाळ ग्रामपंचायतचे चेअरमन बबन हवालदार हे होते.
प्रारंभी ज्येष्ठ ग्रामपंचायत सदस्य एम. वाय. हवालदार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
यावेळी बोलताना विश्वजीत पाटील पुढे म्हणाले की, खासदार जोल्ले, मंत्री शशिकला जोल्ले, चेअरमन श्री. चंद्रकांत
कोटीवाले, कार्यकारी संचालक शिवा कुलकर्णी व संपूर्ण संचालक मंडळ कारखाना व्यवस्थापन यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली कारखान्याची सर्वांगीण प्रगती सुरू असून ऊस उत्पादक शेतकऱ्याला ज्यादा ऊस उत्पादन मिळावे याकरिता कारखान्यामार्फत सभासद शेतकऱ्यांना एकरी दहा हजार रुपयाची खते देण्याचे ठरले असल्याचे सांगितले.
तसेच ऊस तुटून गेल्यापासून खोडवा व्यवस्थापनाचे सर्व शास्त्रशुद्ध पद्धतीने शेती कशा पद्धतीने करावे याचे मार्गदर्शन केले.
यावेळी ग्रामस्थामार्फत उत्कृष्ट मार्गदर्शन केल्याबद्दल विश्वजीत पाटील यांचा नागरी सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला आर. एल. चौगुले, सदाशिव पाटील, प्रशांत पाटील, केशव पाटील, अनिल मंगसुळे, सिद्धगोंडा वंदुरे, रावसाहेब नलवडे, सदाशिव गवळी, रामा हवालदार यांच्यासह सभासद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta