शासनाकडून हिरवा कंदील : इच्छुकांच्या हालचाली वाढल्या
निपाणी : कार्यकाळ संपलेल्या राज्यातील 56 नगरपंचायतना डिसेंबर शेवटच्या आठवड्यात निवडणूक घ्यावे असा आदेश हायकोर्टाने राज्य सरकार व निवडणूक आयोगास दिले आहे. यामुळे डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात बोरगाव नगरपंचायतीची ही निवडणूक होणार आहे. यासाठी शासनाकडून हिरवा कंदील मिळाला आहे. त्यामुळे इच्छुक कामाला लागले आहेत. राज्यातील बोरगाव, नायकनहट्टी, कोटेकारू, एम. के. हुबळी, कंकणवाडी, नागनुर, एकसंबा, कित्तुर, शेडबाळ, चिंचली, कल्लोळी, नालतवाड, निडगुंदी, देवरहिप्परग्गी, अल्मेल, मनगुळी, कोल्हार, कमतगी, बेळगली, अमनगड, गुत्तल, झाली, तावरगेरा, कोकनुरू, भाग्यनगर, कनकगिरी, मरियम्मणहल्ली, कविताळ, बळगानुर, शीरवार, तूरविहाळ या नगरपंचायतीची निवडणूक होणार आहे. त्याचबरोबर नगरसभा व नगर परिषद यांचे ही निवडणूक होणार आहे. वर्षातील शेवटच्या आठवड्यात निवडणूक होणार असून जानेवारी पहिल्या आठवड्यात निकाल लागणार आहेत. त्यामुळे येणारा 2022 हा कुणासाठी चांगला असणार आहे, हे या निवडणुकीत कळणार आहे. सध्या विधानपरिषदची रणधुमाळी चालू आहे. पाठोपाठ नगरपंचायतीची निवडणूक तारीख जाहीर झाल्याने सर्वांचे यामध्ये तारांबळ उडाली आहे. बोरगाव नगरपंचायत निवडणूक ही कधी होणार याबाबत सर्वांना प्रतीक्षा लागली होती. निवडणूक आयोगाने निवडणूक घेण्यास हिरवा कंदील दाखविल्याने येत्या काळात मोठी रणधुमाळी होणार आहे. त्यामुळे आजी-माजी नगरसेवक आताच पासूनच कामाला लागणार आहेत. त्याचबरोबर आपली प्रतिष्ठा पणाला लावण्यासाठी उत्तम पाटील गट व भाजप गटही सक्रीय झाले आहे.
Check Also
केंद्राने सीमाप्रश्नी लक्ष घालण्याची विनंती करणारा ठराव संमत
Spread the love मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल निपाणीत आनंदोत्सव निपाणी : मराठी भाषेला …