भाजप नेत्यांसमवेत बैठक
खानापूर : बेळगाव विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खानापूर येथे घेण्यात आलेल्या भाजप चर्चा बैठकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचे माजी आमदार उपस्थित असल्याने समिती गोटात हा चर्चेचा विषय ठरला आहे.
रमेश जारकीहोळी यांचे बंधू लखन जारकीहोळी हे विधान परिषदेच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर जारकीहोळी बंधूंकडून विविध ठिकाणी बैठका घेतल्या जात आहेत. याच अनुषंगाने आमदार जारकीहोळी यांनी भाजपचे तालुकाध्यक्ष संजय कुबल यांच्यासह पदाधिकार्यांची बैठक घेतली होती.
या बैठकीला समितीचे माजी आमदार आणि बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अरविंद पाटील यांनी हजेरी लावली होती. या आधिच माजी आमदार भाजपमध्ये जाणार अशी चर्चा खानापूरकरांमध्ये होती. मात्र, ती केवळ अफवा असल्याचे सांगून माजी आमदारांनी लोकचर्चेला बगल दिली होती.
पण, माजी मंत्र्यांनी विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या चर्चा बैठकीला उपस्थित राहून माजी आमदारांनी सीमाबांधवांच्या शंकेला आणखीनच हवा दिली आहे. पण, माजी आमदारांनी आगामी वाटचालीसंदर्भात ठोसपणे वाच्यता केली नसल्याने सद्यपरिस्थिती पाहून याबद्दल इतक्यात काहीच न बोलणे योग्य ठरणार आहे.
Check Also
बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी केली गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना
Spread the love बेळगाव : बेळगावचे नूतन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी आपल्या शासकीय निवासस्थानात पत्नी …