प्रा. नितीन बानगुडे- पाटील : बोरगावमध्ये व्याख्यान
निपाणी (वार्ता) : प्रत्येकाने आपल्या मुलाकडून आवास्तव अपेक्षेची मागणी करू नये. मुलांमधील क्षमता, मर्यादा, गुण, ओळखून त्यांना संधी दिली पाहिजे. मुलांना योग्य दिशा दाखवून त्यांचे ध्येय ठरवून दिल्यास ते जीवनात यशस्वी होऊ शकतात. त्यासाठी पालकांनी मुलांवर संस्कार करणे महत्त्वाचे आहे, असे मत व्याख्याते नितीन बानगुडे पाटील यांनी व्यक्त केले.
बोरगाव येथील बोरगाव शिक्षण संघ यांच्या वतीने आयोजित ‘विद्यार्थी, पालक, शिक्षक, संस्कृती व त्यांच्या समोरील आव्हाने’ या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यानमालेत ते बोलत होते.
बानुगडे पुढे म्हणाले, पालक मुलांना जगवण्याची काळजी घेतात. पण त्यांना जगविण्यापेक्षा घडवण्याची काळजी घेणे गरजेचे आहे. पालकांनी मुलांचे कौतुक करण्याचे संधी प्रत्येकाने शोधली पाहिजे शोधली पाहिजे. आपल्या मुलावर आम्हीच मर्यादा लादत आहोत. मुलांना मुक्तपणे शिक्षण घेण्याची संधी द्यावी. आपल्या मुलावर आपणच विश्वास ठेवण्याची वेळ आली आहे. त्यांना प्रेरणा देऊन आपल्या मुलांवर आपण विश्वास ठेवले पाहिजे. त्यांच्या अंगी असलेल्या अलौकिक गुणांचा शोध घेऊन त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. त्यांना ध्येय ठरवून दिले पाहिजे. संघर्ष व परिश्रमातून माणूस यशस्वी होत असतो. मिळालेल्या संधीच सोन करा. यासारखे अनेक विचार वेगळ्या पैलूने मांडून प्रसंगी विनोदी शैलीतून अनेकांच्या मना मनात योग्य संस्काराचे जतन करण्याची जान करून दिली. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वामी विवेकानंद यांच्या जीवन चरित्रावर आधारित प्रेरणादायी अनुभव व पराक्रमाची परिस्थिती जसाच्या तशी उभी करून प्रसंग मांडले.
शाळेचे उपाध्यक्ष आर. बी. पाटील यांनी स्वागत करून संस्थे मार्फत उपस्थित मान्यवरांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास धनश्री पाटील, नगरसेवक अभयकुमार मगदूम, माणिक कुंभार यांच्यासह बोरगाव शिक्षण संघाचे पदाधिकारी, के. एस. पाटील प्रौढ शाळा व ए. बी. पाटील प्राथमिक शाळेचे सर्व पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी पालक उपस्थित होते. पांडुरंग खोत यांनी सूत्रसंचालन तर प्रशांत चौगुले यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta