मानवाधिकार संघटनेतर्फे महिला दिन
निपाणी : स्त्रियांनी आपल्या हक्कांबाबत जागरूक राहून सक्षम बनावे. दैनंदिन जीवनात वेळेचे नियोजन करून मुलींना स्वसंरक्षणाचे धडे दिले पाहिजेत. मुलांनाही घरातील कामे करण्याच्या सवयी लावून मुलींचा व स्त्रियांचा आदर करण्याचे संस्कार रूजवावेत. आई, बहीण, पत्नी व मुलगी या नात्यासोबतच महिला अनेक भूमिका जगत असतात. फक्त महिला दिनाला स्त्रीशक्तीचा जागर न करता सर्वांनी आपल्या कृतीतून त्यांना आदर दिला पाहिजे, असे मत येथील मानवाधिकार संघटनेच्या उपाध्यक्ष विविध कांबळे यांनी येथील पोलीस ठाण्यात आयोजित महिला दिन कार्यक्रमात व्यक्त केले.
अध्यक्षस्थानी मंडल पोलीस निरीक्षक एस. सी. पाटील यांच्या पत्नी पाटील या उपस्थित होत्या.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. त्यानंतर महिला पोलीस हेमलता नाईक यांनी पोलीस ठाण्यातील कार्यपद्धतीची माहिती दिली. यावेळी समाजातील कर्तृत्ववान महिला व विद्यार्थिनींचा गौरव करण्यात आला. त्यावेळी पाटील यांनी महिलांनी स्वसंरक्षणाचे धडे घेण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमास मेघना कॅरकट्टी, प्रिया कांबळे, मानव अधिकार संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत बाबर, सेक्रेटरी वैशाली खोत, संचालक माजी नगरसेवक नंदकुमार कांबळे, सतीश खोत, निखिल वाईंगडे, दयानंद पाटील, वकील विभावरी निर्मळे, तेजस्विनी तोरस्कर, परविन नवाब, कमल जगताप, कल्पना चौगुले, नसिमा पटेल, आस्मा बागवान, वर्षा आवळे, सरोजा ऐवाळे, गीता हुद्दार, ज्योत्स्ना पाटील, मनीषा बाबर, पूजा पाटील यांच्यासह महिला उपस्थित होत्या. दीपा श्रीखंडे यांनी आभार मानले.