
अंमलझरी येथे होम मिनिस्टर कार्यक्रम
निपाणी (वार्ता) : महिलांसाठी गेल्या दीड महिन्यापासून तालुक्यातील प्रत्येक गावात आपण हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करीत आहेत. साडेचार वर्षांपासून तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन युवक, महिला, शेतकरी, कष्टकऱ्यांचे प्रश्न जाणून त्या सोडविण्यासाठी प्राधान्य दिले आहे. ज्येष्ठ नेते रावसाहेब पाटील यांच्यामुळे तालुक्यात अनेक जण आमदार, खासदार, झाले. पण आता तेच आमच्याबद्दल अफवा पसरवीत टीका करीत आहेत. अशा गोष्टींककडे दुर्लक्ष करून कार्यकर्त्यांच्या बळावर विधानसभा निवडणूक लढविणार आहेत. विरोधकांनी कुरघोडीचे षडयंत्र करण्यापेक्षा व्यासपीठावर येऊन बोलावे. आपल्याकडे कोणतेही राजकीय पद नसताना केलेली कामे हे सर्व जनतेला माहित आहे. कार्य कर्त्यांना मान, सन्मान देण्यासाठी सदैव तत्पर असून येत्या विधानसभा निवडणुकीत सर्वांची साथ पाटील कुटुंबीयांना असेल अशी आशा उत्तम पाटील यांनी व्यक्त केली. अंमलझरी येथे आयोजित होम मिनिस्टर कार्यक्रम ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार प्रा. सुभाष जोशी होते.
उत्तम पाटील यांच्या हस्ते होम मिनिस्टर स्पर्धेचे उद्घाटन झाले.
सचिन कौंदाडे यांनी स्वागत केले.
प्रा. जोशी म्हणाले, रावसाहेब पाटील दाम्पत्यांची प्रेरणा व कार्यातून पुत्र अभिनंदन व उत्तम हे निपाणी मतदारसंघात कार्य करीत आहेत. राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व देणारे पाटील कुटुंबीय आहे. आरोग्य, शिक्षण, सहकार, धार्मिक, क्रीडा यासह विविध क्षेत्रांना प्राधान्य देण्यात येत असून येत्या विधानसभा निवडणुकीत महिलांनी एकमत कऊन आपल्या हक्काच्या व्यक्तीला निवडून देण्याचे आवाहन केले. बाबासाहेब पाटील- तवंदी यांनीही मनोगत व्यक्त केले.
होम मिनिस्टर स्पर्धेमध्ये अर्चना राजेंद्र कौंदाडे यांनी पैठणी मिळवली.
कार्यक्रमास धनश्री उत्तम पाटील, निरंजन पाटील- सरकार, गजानन कावडकर, ग्राम पंचायत सदस्य अभिजित कोंदाडे, लक्ष्मी कांबळे, बाळाप्पा गावडे, बाबासो खोत, वसंत रेपे, भीमा खोत, भैरू खोत शिवाजी गावडे, म्हाळाप्पा बन्ने, कृष्णात बाडकर, दादासो पाटील, बाळासो लुगडे, यलगोंडा रेपे, बाळासो खोत, अतुल कोकरे, कुमार कंकणवाडे, रवींद्र मोहिते, रेवण्णा पुजारी, म्हाळूं बन्ने, शिवाजी गावडे, अजित पुजारी, सागर मोरे यांच्यासह उत्तम पाटील प्रेमी, उत्तम पाटील युवा शक्ती संघाचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. महेश खोत यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta