
उत्तम पाटील : बेनाडीत हळदी कुंकू कार्यक्रम
निपाणी (वार्ता) : सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून गेल्या पंचवीस वर्षापासून अरिहंत उद्योग समूहातर्फे समाजकार्य केले जात आहे. त्यामध्ये महिलांना रोजगार, पुरुषांच्या हाताला काम, शेतकऱ्यांना मदत, आरोग्य सुविधा, शिष्यवृत्ती यासह अनेक उपक्रमांचा समावेश आहे. राजकीय सत्ता नसतानाही निरंतरपणे कार्यरत आहोत. पण आता राजकीय मंडळीकडून त्यामध्ये अडथळा आणला जात आहे. त्यामुळे विधानसभा निवडणूक महत्त्वाची असून महिला आणि युवकांनी ही निवडणूक हातात घ्यावे, असे आवाहन बोरगाव पिकेपीएसचे अध्यक्ष उत्तम पाटील यांनी केले.
बेनाडी येथील उत्तम पाटील युवाशक्ती व अरिहंत परिवारातर्फे आयोजित हळदी- कुंकू कार्यक्रमात ते बोलत होते अध्यक्षस्थानी माजी आमदार प्रा. सुभाष जोशी होते.
व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाल्यावर विविध क्षेत्रात यश मिळवलेल्या मान्यवर व विद्यार्थ्यांचा गौरव झाला. यावेळी उत्तम पाटील व मान्यवरांचा सत्कार झाला.
उत्तम पाटील म्हणाले, उद्योग समूहाच्या माध्यमातून क्रीडा क्षेत्राला ही प्राधान्य दिले आहे. महापूर आणि कोरोना काळात सर्वांनाच मदतीचा हात दिला आहे. त्यामुळे यापुढेही युवाशक्तीच्या माध्यमातूनही आपण निरंतरपणे समाजकार्यात कार्यरत राहणार आहे. त्यासाठी मतदान रुपी आशीर्वाद घेऊन सहकार्य करावे.
माजी आमदार प्रा. सुभाष जोशी यांनी, युवक आणि महिलांनी पुढे आल्यास मतदारसंघात निश्चितच बदल होऊ शकतो. लोकप्रतिनिधींकडून हलक्या प्रतीचे राजकारण केले जात आहे. अडचणीच्या वेळी उपयोगी पडणारा उत्तम पाटील हा युवा नेता असून त्यांच्या पाठीशी सर्वांनी राहण्याचे आवाहन केले. रवी पाटील यांनी, ग्रामपंचायत मध्ये दबावाचे राजकारण सुरू असून विकास कामात व्यक्ती येत आहे. त्यासाठी युवकांनी पुढाकार घेऊन गावचा विकास करण्याचे आवाहन केले. विनयश्री पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. ग्रामपंचायत सदस्य शहाजी पाटील यांनी स्वागत केले.
कार्यक्रमास निपाणीच्या माजी नगराध्यक्षा शुभांगी जोशी, सुरज पाटील, ग्रामपंचायत अध्यक्षा सुषमा भोरे, सदस्य सुरेश पाटील, राजू पाटील (भिवशीकर), सुभाष चौगुले, एम. एस. मिरजे, प्रकाश क्षीरसागर, गजानन कावडकर, अनिल चौगुले, सुनील नुले, आशिष शहा, महादेव भोरे, कुमार मंगावते, सागर पिंपळे, महादेव लवटे, शिवाजी हजारे, विशाल फतरे, शेखर भोसले, स्वप्नील चोगुले, विशाल मिरजे सागर बन्ने, धनपाल गोरे, संजय मोरे, बाबुराव खोत, योगेश पोवार, संजय पाटील यांच्यासह उत्तम पाटील युवा शक्ती संघाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. त्रिशला भागजे यांनी सूत्रसंचालन केले.
—————————————————————
उत्तम पाटील युवाशक्ती संघातर्फे आयोजित होम मिनिस्टर स्पर्धेत पुजा तोरणहाळे यांनी फ्रिज अमृता पाटील यांनी तिजोरी, शीला पाटील यांनी ड्रेसिंग टेबल, सविता चिकोडे यांनी मिक्सर, प्रतीक्षा मजगे यांनी स्टॅन्ड फॅन आणि पूजा मिरजे यांनी कुकरचे बक्षीस पटकावले.
Belgaum Varta Belgaum Varta