Share

निपाणी (वार्ता) : २४ तास पाणी योजनेचे काम २००९ पासून आजपर्यंत रेंगाळले आहे. याला यापूर्वीचे सभागृह जबाबदार आहे. पाणीपुरवठ्यासंदर्भात काही तांत्रिक बाबी आहेत त्याकडे लक्ष न देता विरोधक पाण्यावरून जनतेची दिशाभूल करत आहेत, असा आरोप नगराध्यक्ष जयवंत भाटले यांनी केला.
नगरपालिकेत सत्ताधरी गटाची पत्रकार बैठक पार पडली यावेळी ते बोलत होते.
नगराध्यक्ष भाटले म्हणाले, पाणी योजनेच्या निधी आणि आराखड्यानुसार १० हजार नळ जोडण्या असतील तर २४ तास पाणीपुरवठा करता येतो. २०१२ पर्यंत ७ हजार नळजोडण्या होत्या. २०२६ पर्यंत १२ हजार नळ जोडण्या होतील, असे गृहीत धरून त्यादृष्टीने पाईपलाईन आणि नव्या जोडणीचे काम हाती घेतले. पण शहराचा विस्तार गतीने वाढल्याने २०२३ मध्ये तब्बल १५ हजार ९०६ नळजोडण्या झाल्या आहेत. अशावेळी या १६ हजार नळांना सुरळीत पाणीपुरवठा कसा करता येईल, यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
अमृत-२ योजनेतून तीन- ओव्हरहेड टैंक ३५ किलोमीटर पाईपलाईन ५००० नळ जोडण्या आदी कामांसाठी २० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. ते कामही लवकर सुरू होईल. दररोज ११ एमएलडी पाण्याचे शुद्धीकरण होते. यातून वाया जाणारे पाणी वापरात आणले आहे. गळत्या निवारल्या जात आहेत. जुनी टाकी दुरुस्त करणे ३५ लाखांचे संप हाऊस उभारणे आदी कामे सुरु आहेत. मार्च ते मे महिन्यात पाणी पातळी खालावल्यामुळे पाणीपुरवठ्यात व्यत्यय येतो. मात्र तरीही सध्या दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. त्याचे सुरळीत नियोजन झा की लवकरच एक दिवसाआ पाणीपुरवठा करण्यात येईल.
जुन्या पाणीपट्टीचे १४५८ रुप याप्रमाणे ११.५० कोटी रुपयांपैकी केवळ ५.५० कोटी रुपये जमा झाले आहेत. उर्वरीत ६ कोटी रुपये थकबाकी आहे. जुन्याप्रमाण पाणीपट्टी न भरलेल्या नागरिकांनी पाणीपट्टी भरून सहकार्य करावे आम्हीही जनतेसोबत असून कोणत्याही भूलथापांना जनतेने बळी पडू नये, असे सांगितले. नगरसेवक राजू गुंदेशा यांनी, जनतेच्या हितासाठी सक्षमपणे काम केले जात असून काही तांत्रिक अडचणी दूर केल्या जात आहेत. मात्र त्यावरून कोणीही गैरसमज पसरवत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करावे. मोर्चातून जनतेची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप केला. यावेळी उपनगराध्यक्षा नीता बागडे, नगरसेवक संतोष सांगावकर, सद्दाम नगरजी, दत्तात्रय जोत्रे, संतोष माने उपस्थित होते.
Post Views:
1,482
Belgaum Varta Belgaum Varta