Share

निपाणी (वार्ता) : विद्यमान नगराध्यक्षांना अडीच वर्षात शहरवासीयांना सुरळीत पाणी देता आले नाही. आपल्या मुलाला मात्र टेंडर मिळवून देण्याचे काम त्यांनी केले आहे. पाण्यासाठी काढलेल्या मोर्चाला दिशाभूल समजत असाल तर निदान राजकीय फायदा घेण्यासाठी तरी जनतेला सुरळीत पाणी द्या, असे आवाहन विरोधी गटनेते विलास गाडीवड्डर यांनी दिले.
विरोधी घटाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. गाडीवड्डर म्हणाले, जवाहर तलावात आणि वेदगंगा नदीत सत्ताधाऱ्यांना पाणी देण्याचे काम होत नाही. शहरात घंटागाडी आणि कचऱ्याचे नियोजन विस्कटले आहे. सत्ताधाऱ्यांच्या प्रभागांमध्येही कचऱ्याचे ढीग दिसून येत आहेत. एसी गाडीतून फिरले म्हणजे समस्या सुटत नाहीत. आपण नगराध्यक्ष असताना घरोघरी जाऊन समस्या ऐकून घेतल्या होत्या. पाण्यासाठी काढलेला मोर्चा हा जनप्रेरित होता. लोकांच्या मूलभूत गरजांसाठी होता. राजकीय लाभासाठी हा मोर्चा होता असे सत्ताधाऱ्यांना वाटत असेल तर त्यांनी निदान राजकीय लाभासाठी तरी नागरिकांना पाणी सुरळीत द्यावे. जुना पीबी रोडवर पडलेले खड्डे सत्ताधाऱ्यांना दिसत नाहीत. नगराध्यक्षांनी गेल्या अडीच वर्षात केवळ सहा महिन्यातून एकदा सभा घेण्याचे काम केले. महत्त्वाच्या प्रश्नांसाठी तातडीची बैठक कधी घेतली नाही.
अनेकदा मागणी करूनही दुर्लक्ष पाणी हे अत्यावश्यक असल्याने पाण्यासंदर्भात कधीही बैठक घेता येते. मात्र यापूर्वी अनेकदा बैठक घ्यावी म्हणून मागणी केली, निवेदने दिली. तरीही त्याची दखल घेतली नाही.
अडीच वर्षात पाणी समस्येची तीव्र झळ गेल्या दहा वर्षात पाण्याची समस्या जेवढी जाणवली नाही ती गेल्या अडीच वर्षात दिसून येत आहे. नगरपालिका आयुक्तांनी कोणाची चमचेगिरी न करता स्वतंत्रपणे अधिकार वापरून आपले काम करावे, अशी टीकाही गाडीवड्डर यांनी केली. तसेच सत्ताधाऱ्यांकडून विकास होईल या अपेक्षेने विरोध केला नव्हता. मात्र आता सत्ताधाऱ्यांच्या प्रत्येक चुकीवर बोट ठेवण्यात येईल, असे सांगितले.
यावेळी नगरसेवक बाळासाहेब देसाई सरकार, शौकत मनेर, दत्तात्रय नाईक, डॉ. जसराज गिरे, अनिता पठाडे, नगरसेविका सुनीता गाडीवड्डर यांच्यासह नगरसेवक व नागरिक उपस्थित होते.
Post Views:
1,520
Belgaum Varta Belgaum Varta