
प्रा. रवींद्र चव्हाण; कुर्ली हायस्कूलमध्ये पारितोषिक वितरण
निपाणी (वार्ता) : सध्या जगाची वाटचाल ही स्पर्धात्मक आहे. प्रत्येक व्यक्ती प्रत्येकांशी स्पर्धा करण्यासाठी धजावलेला आहे. स्पर्धा परीक्षा ही आजच्या काळाची गरज आहे. स्पर्धा केल्याशिवाय यश देखील मिळणार नाही. परंतु स्पर्धा करीत असतांना सामाजीक हिताचा देखील विचार करायला पाहिजे. स्पर्धा परीक्षेत यश मिळविणे हे अंतिम ध्येय न मानता ते सामाजिक सेवेचे साधन मानले पाहिजे. उचित ध्येय हेच यशाचा मार्ग दाखवित असते, असे मत अर्जुननगर (ता. कागल) येथील देवचंद महाविद्यालयाचे प्रा. रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केले. कुर्ली येथिल सिद्धेश्वर विद्यालयात आयोजित वार्षिक पारितोषिक वितरण प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक बी. एस. पाटील होते.
टी. एम. यादव यांनी स्वागत केले. केदार मगदूम, श्रद्धा शिंदे, श्रुती शिंत्रे, श्वेता बुधाळे यांनी मनोगत व्यक्त केले. एस. एस. चौगुले यांनी दहावी परीक्षेबाबत मार्गदर्शन केले. ए. ए. चौगुले यांनी पारितोषिक वितरण अहवाल वाचन केले. मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
सुजित यादव व मंजिरी कांबळे यांना आदर्श विद्यार्थी तर साक्षी हेरवाडे व उत्कर्ष पाडेकर यांना उत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. याप्रसंगी दहावीच्या विद्यार्थ्यांनी व पालकांनी नवीन इमारत बांधकामासाठी विद्यालयास एक लाख रुपये देणगी दिली. बी एस पाटील यांनी देणगीबाबत कृतज्ञता व्यक्त केली.
याप्रसंगी एस. एस. चौगुले, डी. डी. हाळवनकर, आर. आर. मोरे, यु. पी. पाटील, ए. डी. बंडी, विजय साळुंखे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. ए. ए. चौगुले यांनी सूत्रसंचालन केले तर एस. ए. पाटील यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta