Wednesday , March 4 2026
Breaking News

विधानसभेची काँग्रेसची उमेदवारी आपल्यालाच

Spread the love
काकासाहेब पाटील : अफवांवर विश्वास ठेवू नये
निपाणी (वार्ता) : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षातर्फे वरिष्ठ नेते मंडळींनी आपल्याच उमेदवारीची शिफारस केली आहे. मतदारसंघात विविध अफवा पसरल्या जात असला तरी त्यावर कार्यकर्त्यांनी विश्वास ठेवू नये. माजी मंत्री वीरकुमार पाटील व त्यांचे सर्व सहकारी ही निवडणूक पार पाडणार आहेत. त्यामुळे आपण निवडणूक लढवून निवडून येण्याचा दृढ निश्चय केल्याची केल्याची माहिती माजी आमदार काकासाहेब पाटील यांनी दिली. येथील काँग्रेस कार्यालयात नेते मंडळी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
माजी मंत्री विरकुमार पाटील म्हणाले, निपाणी परिसरात विविध चर्चेला उधाण आले आहे. त्यामध्ये कोणतेही तथ्य नसून केपीसीसी अध्यक्ष सतीश जारकीहोळी, डी.के. शिवकुमार, विरोधी पक्ष नेते सिद्धरामय्या यांच्याशी उमेदवारी संदर्भात भेट झाली आहे. त्यामुळे उमेदवारी बाबत कोणीही शंका व्यक्त न करता कार्यकर्त्यांनी कामाला लागावे.
चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांनी, काँग्रेसमध्ये नसलेले आणि काँग्रेसच्या चिन्हावर एकही कार्यक्रम न घेतलेले काही जण आपणालाच काँग्रेसचे तिकीट मिळणार असल्याचे सांगत आहेत. ते चुकीचे असून काँग्रेसला तयार झालेलो पूरक वातावरणाला छेद देण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सुरू आहे. काँग्रेसची उमेदवारी काकासाहेब पाटील यांनाच असून पाडव्यानंतर मल्लिकार्जुन खर्गे राहुल गांधी यांच्यासह नेते मंडळी काकासाहेब पाटील यांना उमेदवारी जाहीर करतील. कार्यकर्त्यांनी संभ्रमावस्थेत न राहता पक्षाच्या पाठीशी कायम राहण्याचे आवाहन केले. पंकज पाटील यांनी, काहीजण आपणच काँग्रेसला बळकटी दिल्याचे सांगत असले तरी ग्रामपंचायत निवडणुकीत डोंगराळ भागात काँग्रेस विरोधी पॅनल कुणी उभे केली आणि त्याला रसद कुणी पुरवली असा प्रश्न उपस्थित केला.
यावेळी निपाणी भाग काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, बेडकीहाळ भाग काँग्रेस अध्यक्ष बसवराज पाटील, युवा उद्योजक रोहन साळवे, माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वडर, एस. एस. पाटील, प्रतीक शहा, अवधूत गुरव, दीपक ढणाल, प्रशांत नाईक, विजय शेटके, राजेंद्र चव्हाण, किरण कोकरे, इंद्रजीत बगाडे, निकु पाटील, अशोक लाखे, एड. संजय चव्हाण, अन्वर हुक्केरी, अब्बास फरास,अशोक लाखे, अशोक पाटील, रियाज बागवान अण्णासाहेब तांदळे, अमृत ढोले, श्रीनिवास संकपाळ, राजू बगाडे, महादेव कौलापुरे, विकास लोकरेयांच्यासह निपाणी मतदारसंघाचे काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
————————————————————
सोमवारी (ता.२०) सकाळी ११.३० बेळगाव येथे युवा क्रांती महामेळावा होणार आहे. यावेळी काँग्रेसचे नेते राहुल गांधी, अखिल भारतीय काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, डी. के. शिवकुमार विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. त्यासाठी निपाणी मतदारसंघातून कार्यकर्त्यासाठी वाहनांची सोय केल्याचे माजी मंत्री विरकुमार पाटील यांनी सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

निपाणी परिसरात होळीचा सण भक्तीभावाने

Spread the love  आता सर्वांनाच रंगपंचमी सणाची आतुरता निपाणी (वार्ता) : शहर, उपनगर आणि ग्रामीण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *