Wednesday , December 10 2025
Breaking News

महिलांनी हसत, खेळत जीवन जगावे : वसंत हंकारे

Spread the love

 

निपाणीत श्रमसाफल्य पुरस्कारांचे वितरण
निपाणी (वार्ता) : अलीकडच्या काळात आचार विचारांमध्ये बदल होत चालले आहेत. त्यामुळे विविध प्रकारचे रोगराई पसरत आहे. त्यामध्ये महिलांची संख्या मोठी आहे. घरातील एकलकोंडाही त्याला कारणीभूत ठरत आहे. त्यासाठी महिलांनी नेहमी हसत खेळत जीवन जगले पाहिजे. महिला अबला नसून त्या सबला बनले आहेत. तरीही वेगवेगळ्या प्रकारे त्यांच्यावर अन्याय होत आहे. त्या विरोधात महिलांनी संघटित होऊन आवाज उठवण्याची गरज आहे. देशातील माता सुरक्षित असतील तरच देशात सुराज्य निर्माण होईल, असे मत सांगली येथील व्याख्याते वसंत हंकारे यांनी व्यक्त केले. येथील दिग्विजय युथ क्लब, साखरवाडी स्पोर्ट्स क्लब, इनरव्हील क्लब, नारीशक्ती नारीशक्ती महिला मंडळ, जिजामाता भगिनी मंडळ, आणि क्रांतीज्योती महिला मंडळाच्या संयुक्त विद्यमाने दिवंगत सुनिता मानवी यांच्या स्मरणार्थ ’सुखी कुटुंब, आनंदी कुटुंब, चला आनंदाने जगूया’ या विषयावरील व्याख्यान आणि श्रमसाफल्य पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.
प्रारंभी व्यासपीठावरील मान्यवरांचे हस्ते क्रांतीज्योती सावित्री फुले, ज्योतिबा फुले, राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. बाळासाहेब कळसकर यांनी स्वागत तर दिग्विजय युथ क्लबचे अध्यक्ष दीपक इंगवले यांनी प्रास्ताविक केले. शरयू मानवी यांनी मनोगत व्यक्त केले. संजीवनी पावले यांनी कवितेतून स्त्री जन्माची कहाणी मांडली. क्रांतीज्योती महिला मंडळाच्या पदाधिकार्‍यांनी महिला दिनावर गीत सादर केले.
यावेळी इंदूबाई सावंत, संगीता शिंदे शैला पारळे, शाहीदा नाईकवाडे, लक्ष्मी पावले, शंकुतला कुराडे, बचराम बोंगार्डे, गीता कदम, जयश्री घोडके, शुभांगी कांदेकर, मिना शेटके, अनुसया खाडे, अर्चना घाटगे, प्रा. शांतला एम. के. यांच्यासह मान्यवरांना श्रम साफल्य पुरस्काराने गौरविण्यात आले.
कार्यक्रमास उज्वला निर्मळे, पुष्पा कुरबेट्टी, स्वाती दबडे, जिजाबाई राऊत, राजश्री चव्हाण, डॉ. मृदुला कुलकर्णी, लीलाताई कदम राजेश्वरी जडी, शोभा खाडे, मीनाक्षी कोठीवाले, डॉ. स्नेहा पाटील, दिपाली वाडकर, भाग्यश्री सदलगे, वंदना इंगवले, परविन नालबंद, वैजयंती बुद्धाचार्य लतिका दैव, लतिफा पठाण, राधिका इंगवले योगिता कळस्कर, अशोक राऊत, बाळासाहेब कळसकर, सुधाकर सोनाळकर, रोहन राऊत, प्रदीप जाधव, ज्योतिबा पाटील, सुधाकर कुर्‍हाडे यांच्यासह महिला उपस्थित होत्या. सागर सांडगे यांनी सूत्रसंचालन केले.

About Belgaum Varta

Check Also

शेतकऱ्यांनी न्याय, हक्कासाठी अधिवेशनातील मोर्चात सहभागी व्हावे

Spread the love  राजू पोवार यांचे भावनिक आवाहन : ‘रयत’च्या पदाधिकाऱ्यांची निपाणीच बैठक निपाणी (वार्ता) …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *