Share

निपाणीत हळदी कुंकू कार्यक्रम
निपाणी (वार्ता) : कुटुंब आणि समाजाच्या जडणघडणीमध्ये महिलांचा सहभाग महत्त्वाचा आहे. तरीही अजूनही महिलांच्यावर अन्याय अत्याचार होतच आहेत. आता महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करीत आहेत. सर्वसामान्य महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी अरिहंत उद्योग समूहाने अनेक उद्योग व्यवसाय उपलब्ध केले आहेत. त्याचा शेकडो महिलांना लाभ होत आहे. या पुढील काळातही महिलांच्या प्रगतीसाठी अरिहंत संस्था प्रयत्नशील आहे. महिलांच्या एकीमुळेच समाजात बदल शक्य असून त्या दृष्टीने महिलांनी कार्य करावे, असे आवाहन धनश्री उत्तम पाटील यांनी केले.
अरिहंत उद्योग समूह आणि उत्तम पाटील युवाशक्ती संघातर्फे येथील दर्गाह गल्ली येथे आयोजित हळदीकुंकू कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी माजी आमदार प्रा. सुभाष जोशी तर प्रमुख पाहुणे म्हणून बोरगाव पिकेपीएसचे अध्यक्ष उत्तम पाटील, माजी नगराध्यक्षा शुभांगी जोशी होत्या.
माजी नगरसेवक मज्जीद सय्यद यांनी स्वागत केले. माजी आमदार प्रा. सुभाष जोशी, स्मिता धुमाळे, नगरसेवक शेरू बडेघर, प्रवीण नवाब यांनी मनोगत व्यक्त केले.
होम मिनिस्टर स्पर्धेत पुनम शेलार, सपना कोरवी, सुनिता रणदिवे, अनुराधा साळुंखे, करुणा कांबळे, मिनाज कडवी, दिपाली खोत, संगीता घाटगे, अनिता साळुंखे, सुजाता मुरगुंडे, भाग्यश्री जगताप, अवंतिका चव्हाण शिल्पा चव्हाण, नकुशा चव्हाण, वैशाली धनवडे, गायत्री अबदागिरी, रोहिणी चव्हाण, जयश्री पाटणकर यांनी बक्षिसे मिळवली.
या कार्यक्रमास नगरसेवक शौकत मनेर, संजय पावले, अनिस मुल्ला, दिलीप पठाडे, दत्तात्रय नाईक, सुनील शेलार, शेरू बडेघर, विकास चव्हाण, सोमनाथ शिंदे, सुमित शेलार, मैनु मुल्ला, पांडुरंग भोई, इरफान महात, चेतन चव्हाण, सचिन पोवार, मौला टिनमेकर, पुनम लाड यांच्यासह महिला व अरिहंत उद्योग समूहाचे पदाधिकारी उपस्थित होते. तन्वीर जमादार यांनी आभार मानले.
Post Views:
270
Belgaum Varta Belgaum Varta