राजू पोवार :शेंडूर जनजागृती संस्थेचा वर्धापन दिन
निपाणी/(वार्ता) : शेतकऱ्यांना विश्वासात न घेता शेंडूर येथे होऊ घाललेल्या पवनचक्की प्रकल्पामुळे शेतकयांचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकरी आणि रयत संघटनेने त्याला विरोध दर्शविलेला आहे. याबाबत पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देऊन काम थांबविण्याचे आवाहन केले आहे. तसेच शेतकरी व ग्रामस्थांना विश्वासात घेऊन काम सुरू केल्यास विविध मागण्यांची पूर्तता प्रोजेक्ट राबविणा-यांना करावी लागणार आहे. तसे न झाल्यास रयत संघटना आंदोलन केल्याशिवाय राहणार नसल्याचे मत चिकोडी जिल्हा रयत संघटनेचे अध्यक्ष राजू पोवार यांनी दिला. शेंडूर येथे जनजागृती ग्रामीण विकास संस्थेचा पहिला वर्धापन दिन साजरा झाला. त्यावेळी अध्यक्ष स्थानावरून पोवार बोलत होते.
प्रारंभी संजय लाड यांनी स्वागत तर संस्थेचे अध्यक्ष शिवाजी लाड यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला.
कार्यक्रमात कुमार पाटील, विलास लाड, शिवाजी वाडेकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी संभाजी आंबोले, भरत ढोकरे, कृष्णात माने, पांडुरंग तोडकर, बाळू कांबळे, शिवाजी कांबळे, मारुती यादव, अण्णाप्पा लाड, पांडुरंग मिसाळ, शिवाजी पाटील, राजीव किल्लेदार, संजय नाईक, चंद्रकांत केसरकर, संदीप इंदलकर, संदीप भोंगाळे, दयानंद खामकर, शंकर डावरे, बबलू पाटील, विलास तोडकर, बाबुराव शिंदे, धनाजी आंबोले, सनी कांबळे, सुधाकर कांबळे, पुंडलिक नाईक, रामचंद्र दळवी, कृष्णा कांबळे, जानूमामा तोडकर, गजानन कुंभार यांच्यासह शेतकरी व संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta