Wednesday , December 10 2025
Breaking News

मतदारसंघात खालच्या दर्जाचे राजकारण : युवा नेते उत्तम पाटील

Spread the love

 

सुळगाव येथे हळदी कुंकू कार्यक्रम

कोगनोळी : सुळगाव येथे उत्तम पाटील युवाशक्ती व अरिहंत उद्योग समूह यांच्या वतीने महिलांच्यासाठी हळदी कुंकू व होम मिनिस्ट्रर कार्यक्रम झाला.
दिपप्रज्वलन माजी आमदार सुभाष जोशी, युवा नेते उत्तम पाटील, बाबुराव मगदूम व इतर मान्यवरांच्या हस्ते झाले.
युवा नेते उत्तम पाटील यांचे सुळगाव ग्रामस्थांच्या वतीने भव्य मोटर सायकल रॅली काढून स्वागत केले.
यावेळी आंबेडकर नगर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. यावेळी आंबेडकर नगर येथील दलित क्रांती संघटना व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समस्त समाज यांच्या वतीने युवा नेते उत्तम पाटील यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला.
अध्यक्ष माजी आमदार सुभाष जोशी, बाबुराव मगदूम, माजी जिल्हा पंचायत सदस्य जयवंत कांबळे, सतीश मगदूम यांनी मनोगत व्यक्त करून युवा नेते उत्तम पाटील यांच्या कार्याचा आढावा घेतला.
युवा नेते उत्तम पाटील म्हणाले, राजकारणाला समाजकार्याची जोड असावी, अनेक सत्ताधारी लोक खालच्या पद्धतीने राजकारण करून अनेक लोकांना अडीअडचणी निर्माण करत आहेत. ज्या ग्राम पंचायती आमच्याकडे आहेत. त्या ग्रामपंचायतींच्या विकास कामांमध्ये अडथळा निर्माण करून सूड भावनेचे राजकारण चालू आहे. साखर कारखान्याच्या मार्फत शेतकऱ्यांना त्रास चालू केला आहे. आरोग्य व्यवस्था विस्कळीत झाली आहे. फक्त आणि फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी अनेकांना पायदळी तुडवले जाते. असं खालच्या पातळीचे राजकारण सध्या चालू आहे. या सर्वाला कुठेतरी आळा बसावा म्हणून आम्ही अरिहंत शुगरच्या माध्यमातून विना राजकारण सरसकट शेतकऱ्यांचे ऊस कारखान्याला दिले. अरिहंत हॉस्पिटलच्या माध्यमातून गोरगरिबांना आरोग्याच्या सुविधा दिल्या. त्याचप्रमाणे पुढील काळामध्ये तरुणांसाठी नोकरी व्यवसाय उपलब्ध करून देण्याचे ध्येय आहे. आम्ही आतापर्यंत कोणत्याही प्रकारचं समाजकार्यामध्ये राजकारण आणलेलं नाही.  मतदार संघातील गोरगरीब जनतेसाच्या न्याय हक्कासाठी लढने हाच आमचा आता इथून पुढे उद्देश असणार आहे. येत्या काळामध्ये आपण सर्वांनी मला आशीर्वाद देऊन आपली सेवा करण्याची संधी द्यावी. असे बोलताना म्हणाले. यावेळी सुळगावच्या होम मिनिस्ट्रर होण्याचा मान पुनम पोवार यांनी मिळवला. तर मनीषा कांबळे, कीर्ती कांबळे, पूजा मगदूम, काजल पाटील यांनी अनुक्रमे बक्षिसे पटकावली.
विनश्री पाटील व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे दिली.
स्वागत अनिल सुतार यांनी तर आभार सोनू कदम यांनी मानले. यावेळी राज हिरानंद, मधुकर पाटील, कोगनोळी ग्राम पंचायत सदस्य सुजित माने, अश्विनी बेडगे, सुनिता गोरडे, संतोष कांबळे, अश्विनी मगदूम, भिकाजी कांबळे, सुवर्णा शिरोळे, एस पी पाटील यांच्यासह उत्तम पाटील युवाशक्ती पदाधिकारी, ग्रामस्थ, महिला विविध सेवा संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

निपाणीत शस्त्रधारी चोरट्यांकडून धाडसी घरफोडीचा प्रयत्न

Spread the love  चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद : चोरटे धावले पोलिसांच्या अंगावर निपाणी-(वार्ता) : शहरासह उपनगरात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *