कोगनोळी : आगामी विधानसभा निवडणुकीची घोषणा कधीही होऊ शकते. या पार्श्वभूमीवर शासनाने अनेक ठिकाणी तपासनाके उभारले आहेत. आप्पाचीवाडी फाटा या ठिकाणी वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे.
आडी डोंगराच्या पश्चिमेकडील बाजूस मल्लिकार्जुन डोंगर कर्नाटक-महाराष्ट्राची सीमा असल्याने महाराष्ट्रातून कर्नाटकात येणाऱ्या सर्व वाहनधारकांची या ठिकाणी कसून तपासणी करण्यात येत आहे. महसूल खाते, पोलीस खाते, ग्रामपंचायत प्रशासन व अबकारी खात्याच्या कर्मचाऱ्यांची तपासणी नाक्यावर नेमणूक करण्यात आली आहे. या नाक्यावरती जिल्हा व तालुका पातळीवरील अधिकारी भेटी देऊन पाहणी करीत आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाहनधारकांची कसून चौकशी होत असल्याचे चित्र कर्नाटक सीमाभागात पहावयास मिळत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta