
समाजाने काढला मोर्चा : तहसीलदारांना निवेदन
निपाणी (वार्ता) : हिंदू वर्गाच्या आरक्षणाचा भाग म्हणून वर्ग २ (ब) म्हणून मुस्लिम समाजाला मंजूर ४ आरक्षण देण्यात आले होते. त्याचा समाजातील विद्यार्थी, नोकरदार उमेदवार आणि समाजातील नागरिकांना लाभ होत होता. पण राज्य सरकारने समाजाचे असलेले ४ टक्के आरक्षण रद्द केले आहे. त्यामुळे समाजावर परिणाम होणार असून पूर्वीप्रमाणे आरक्षण ठेवावे, या मागणीसाठी येथील मुस्लिम समाजाने तहसीलदार कार्यालयावर उल्माहिंदतर्फे मोर्चा काढून निजाम मन्नोळी यांच्या हस्ते तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले.
निवेदनातील माहिती अशी, पूर्वी १९७९ मध्ये सरकारने देवराज आरस मधून मुस्लिमांना हिंदू जातींचा भाग म्हणून सवलती दिल्या होत्या. मात्र सध्याच्या सरकारने ही सवलत रद्द केली आहे. त्यामुळे मुस्लिमांना वैद्यकीय शिक्षणात ३००, अभियांत्रिकीमध्ये १७००, दंतचिकित्सामध्ये ५० जागा आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये वर्षाला २००० जागा गमवाव्या लागणार आहेत.
आरक्षणाचा मुस्लिमाजाचा कायदेशीर अधिकार आहे. त्याचप्रमाणे, मुस्लिम, इतर जाती, धर्मांपेक्षा आर्थिकदृष्ट्या अधिक हिंदू आहेत. त्यांचे आरक्षण रद्द केल्याने घटनेच्या कलम २९ आणि ३० चे उल्लंघन झाले आहे. घटनेनुसार अल्पसंख्याकांना विशेषाधिकार देण्यात आले आहेत. त्यामुळे मुस्लिम समाजाला या आधीच दिलेली सवलत रद्द करू नये. सध्या रमजान महिना सुरू असल्याने समाज बांधव शांततेने निवेदन देऊन मागणीची पूर्तता करण्याचे आवाहन केले आहे. मागण्या मान्य झाल्यास रमजान महिना संपल्यानंतर सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
तहसीलदार विजय कडगोळ यांनी निवेदन स्वीकारून जिल्हाधिकाऱ्यामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्याचे आश्वासन दिले. के. एम. वठारे यांनी निवेदनाचे वाचन केले.
यावेळी नगरसेवक शेरू बडेघर, शौकत मनेर, शेरगुलखान पठाण, झाकीर कादरी, बक्तीयार कोल्हापूरे, शौकत जमादार, जावेद कुमनाळे, राजू बारवाडे, जावेद कोल्हापुरे, अस्लम बागवान, मेहबूब तहसीलदार, सादिक मंदीवाले, मुसा चांदखान, जावेद नाईक, राजू मुल्ल, इरफान महात, अनिस मुल्ला, सैफ पटेल, काशीमखान पठाण, अन्वर बागवान, बादशहा बागवान, फारूक गवंडी यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते.
————————————————————–
बोरगाव मुस्लिम समाजातर्फे निवेदन
मुस्लिम समाजाला दिलेले चार टक्के आरक्षण राज्य सरकारने रद्द केले आहे. ते पूर्वत करण्यासाठी बोरगाव येथील मुस्लिम समाजातर्फे तहसीलदारांना निवेदन दिले. यावेळी तैमूर मुजावर, जावेद मकानदार, साबीर नदाफ, हफिमोहम्मद अली, इर्शाद मकानदार, नवाज कापसे यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta