
कुर्लीत काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक
कोगनोळी : कुर्ली गावाला स्वातंत्र सैनिकांचा इतिहास आहे. कुर्ली गावाने कायम काँग्रेस पक्षाला भरभरुन मतदान दिले आहे. आपल्यापासून काही लोक दुरावले असतील पण कार्यकर्ते हे काँग्रेस पक्षासोबतच आहेत. येत्या निवडणुकीत मी स्वतः कुर्ली गावात लक्ष घालून पक्षाला सर्वांधिक मताधिक्य देणार असल्याचे प्रतिपादन माजी ऊर्जामंत्री वीरकुमार पाटील यांनी केले.
कुर्ली (ता. निपाणी) येथे विधानसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत अध्यक्षपदावरुन ते बोलत होते.
माजी ग्रामपंचायत अध्यक्ष कुमार माळी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
यावेळी बोलताना चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे म्हणाले, ही निवडणूक सामान्य जनतेची निवडणूक आहे. काँग्रेस पक्ष कायमच सर्वसामान्यांच्या पाठीशी उभा राहिला आहे. येत्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने अनेक गॅरंटी दिली असल्याचे त्यांनी सांगितले.
माजी आमदार काकासाहेब पाटील म्हणाले, काँग्रेस पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवून ६ वेळा उमेदवारी दिली आहे. मतदार संघात जाणून बुजून काही अफवा पसरवल्या जात आहेत. ही निवडणूक सर्वसामान्य जनतेची आहे. विरोधक सांगतात की मतदार संघात १७०० कोटींची विकासकामे केली पण विकास कुठेच दिसत नाही. आपण आमदार असतेवेळी कोणताही पक्षपात केला नाही. सर्वसामान्य लोकांची कामे, मतदार संघात शाश्वत विकासकामे केली. कर्नाटकात काँग्रेसचेच सरकार येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी निपाणी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, अशोकआण्णा पाटील, माजी जिल्हापंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील, रोहन साळवे, निपाणीचे माजी नगराध्यक्ष विजय शेटके, राजेंद्र चव्हाण, प्रकाश खोत, बी.जी.चौगुले, नंदकुमार खोत, शिवाजी निकाडे, अमित खोत, नामदेव निकाडे, शिवाजी इंगळे, कृष्णात निकाडे, राजेंद्र चौगुले, बाळू निकाडे, अमोल यादव, तात्या पाटील, केदारी चौगुले, युवराज पाटील, बाळू चौगुले, विजय पाटील, आनंदा चौगुले, प्रकाश डोंगरे, सोमनाथ चौगुले, कृष्णात पाटील, सुधीर देसाई, आप्पा नेजे, अर्जुन निकाडे, शशी पाटील, दीपक वाळके, दत्ता पाटील, दीपक शिंत्रे, सुधाकर व्हराटे, रणजित डोंगरे, दयानंद व्हराटे, सिद्धू माळी, विष्णू डोंगरे, रोहिदास जाखळे, सत्यवान माळी, अशोक माने, बजरंग माळी, राहूल माने, रामा कवाळे, दीपक दिवटे, सदाशिव हुपरे, हिंदूराव माने, गणेश कांबळे, दीपक घस्ती, शुभम माने, पंडित पाटील, दत्ता माने, आण्णासो पाटील, धनाजी पोटले, संभाजी पाटील यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. धीरज पाटील यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta