Share
डॉ. राजेश बनवन्ना; निपाणीत आम आदमी पक्षाची बैठक
निपाणी (वार्ता) : वाढती महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचाराला नागरिक कंटाळले आहेत. शिवाय राष्ट्रीय पक्षाबाबत सर्वत्र रोष व्यक्त होत आहे. समाजातील भ्रष्टाचार व महागाई कमी करण्यासाठी आम आदमी पक्षाचे कार्य सुरू आहे. निपाणी मतदार संघात परिवर्तन घडवण्यासाठी आपण आम आदमी पक्षातर्फे निवडणूक रिंगणात असल्याची माहिती निपाणी विभाग आम आदमी पक्षाचे प्रमुख डॉ. राजेश बनवन्ना यांनी दिली. येथील कार्यालयात आयोजित पक्षाच्या बैठकीत ते बोलत होते.
बेळगाव जिल्हा उपाध्यक्ष वशिम पठाण यांनी स्वागत केले.
डॉ. बनवन्ना म्हणाले, शहरात आम आदमी पक्षाची स्थापना केल्यापासून गेल्या सहा महिन्यात शहर व ग्रामीण भागातील विविध समस्या मार्गी लावल्या आहेत. आतापर्यंत मतदार संघातील सर्वच गावातील दौरा पूर्ण करून ध्येयधोरणे पटवून दिली आहेत. अजूनही मूलभूत सुविधा पासून अनेक गावे वंचित आहेत. दिल्ली, पंजाब प्रमाणे या मतदारसंघात बदल घडवून भ्रष्टाचार मुक्त करण्याचा निर्धार केल्याचे सांगितले.
प्रा. कांचन बिरनाळे पाटील यांनी, भ्रष्टाचार मुक्त कारभार, ३०० युनिट पर्यंत विज बिल माफ करण्यासह २४ तास वीजेची हमी, घरगुती वापरकर्त्यांसाठी दरमहा, शिक्षणाच्या हमी बरोबर विना जामीन कर्ज पुरवठा, सरकारी शाळा सुस्थितीत बनविणे, दिल्लीसारख्या खाजगी शाळांपेक्षा सरकारी शाळा चांगल्या बनवणे. विद्यार्थ्यांसाठी मोफत बस सेवा दिली जाणार आहे.खासगी शाळांचे शुल्क निश्चित करणे, कंत्राटी शिक्षकांना कायम करणे, आरोग्याची हमी, विधानसभा मतदारसंघात दिल्ली मॉडेलचे १० मल्टीस्पेशालिटी पॉलीक्लिनिक, तरुणांना रोजगाराची हमी देण्यासह विविध सुविधा राबविण्यात येणार असल्याचे सांगितले.
यावेळी आदर्श गिजवनेकर, नंदकिशोर कंगळे, राजू दिल्लीवाला यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
———————————————————-
नगरपालिका, ता.,जि. पंचायत निवडणूक लढविणार
सध्या निपाणी विधानसभा निवडणूक लढवणार आहे. आपण काळात ग्रामपंचायत, नगरपालिका, तालुका पंचायत आणि जिल्हा पंचायत निवडणुका लढवणार असल्याचे डॉ. बनवन्नायांनी स्पष्ट केले.
Post Views:
491
Belgaum Varta Belgaum Varta