निपाणी (वार्ता) : गोवा हरमल पंचक्रोशी शिक्षण मंडळ, बेळगाव येथील इंटिग्रेटेड सोशल वेल्फेयर सोसायटी (रजि.) व नॅशनल रूरल डेव्हलपमेंट फाउंडेशन तर्फे राष्ट्रीय पुरस्कार सोहळा गोवा येथे पार पडला. त्यामध्ये येथील धर्मवीर संभाजीराजे नगरातील सुनील दळवी यांच्या कलाकृतीची दखल घेऊन त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरील उत्कृष्ट कलाकार गौरव पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या पुरस्कारामुळे कर्नाटक व महाराष्ट्रात त्यांचे कौतुक होत आहे.
यावेळी माजी कायदामंत्री विराप्पा मोईली, माजी केंद्रीय मंत्री रत्नमाला सावनूर, माजी खासदार अमरसिंह पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta